पितांबर भोसले यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवावी नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, March 20, 2021

पितांबर भोसले यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवावी नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी...


मंगळवेढा/प्रतिनिधी

               राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक होत असुन या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाल्याने मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता वेगळाच सुर आला असून कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण आमदार होणार याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.


                      सन 2019 मध्ये आमदारकीच्या रेसमध्ये असलेले व शासकीय सेवेत असलेले वर्ग एकचे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते पितांबर भोसलेसाहेब पाठीमागील पंचवीस वर्षापासून शासकीय सेवेत असताना त्यांनी समाजसेवेचे मोठ्या प्रमाणात वृत्त जोपासले असून गावाकडील नागरीक मुंबई शहरामध्ये काही काम घेऊन आल्यानंतर त्या नागरीकांची त्या कामात तर मदत करणे मात्र इतर गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणात मदत करण्याच्या कामाची पोचपावती पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिक देत आहेत.म्हणून मंगळवेढा-पंढरपुर विधानसभा मतदारसंघामधून युवक-युवती ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींमधून पितांबर भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत आमदारकीची निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे.

            2019 मध्ये जवळपास पंढरपूर-मंगळवेढ्यातील प्रत्येक गावामध्ये पितांबर भोसले यांनी युवक-युवतींना व नागरिकांना एकत्रित करून चहा-पान व मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पक्षाचे तिकीट मिळाले नसल्यामुळे व वरिष्ठांच्या मर्जीखातीर गप्प रहावे लागले होते मात्र आता त्यातच मंगळवेढ्यातील विशेष करून या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार ठरवणारी दुष्काळी 35 गावातील युवक-युवती व नागरिकांमधून पितांबर भोसले यांनी ही निवडणूक लढवावी व त्यांना आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून देउन या भागांमध्ये "न भूतो: न भविष्यतो:" असा एक इतिहास घडविणार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

            खऱ्या अर्थाने पितांबर भोसले यांचे सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात योगदान असून त्यांनी आजपर्यंत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, त्याचबरोबर शालेय साहित्य वाटप करणे,विविध स्पर्धा परीक्षा वर आधारित मार्गदर्शन शिबिराचे, कार्यक्रमाचे आयोजन करणे, अन्नदान करणे,गोरगरीब कुटुंबांना आर्थिक मदत करणे या आणि अश्या अनेक प्रकारच्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात त्यांचे योगदान असून काही झाले तरी पितांबर भोसले यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची ही निवडणूक लढवावी अशी मागणी युवक-युवती,शेतकरी, व्यापारीवर्गातून व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात होऊ लागली  आहे.

Pages