समाधान आवताडे यांना घरातूनच राहणार आव्हान सिद्धेश्वर आवताडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, March 25, 2021

समाधान आवताडे यांना घरातूनच राहणार आव्हान सिद्धेश्वर आवताडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात....


 मंगळवेढा/प्रतिनिधी

               पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुक असणारे दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या बरोबरीने त्यांचे चुलतबंधू खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे हे उभे राहणार  असून त्यादृष्टीने जेष्ठ नेते बबनराव आवताडे व सिद्धेश्वर आवताडे या पितापुत्रांनी गावभेट दौरे चालू करून कार्यकर्त्याना आपण निवडणुकीसाठी उतरणार असल्याचे सांगत तयारीला लागण्याचे आवाहन करीत आहेत चुलते बबनराव आवताडे यांच्या भूमिकेमुळे  समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढणार आहे.दरम्यान आज सिध्देश्वर आवताडे यानी स्वाता जाऊन अर्ज घेतला आहे.

           


                पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून भगीरथ भालके यांचे नाव फिक्स झाल्याची चर्चा असून भाजपाकडून आमदार प्रशांत परिचारक दामाजी चे चेअरमन समाधान आवताडे उद्योजक अभिजीत पाटील बी.पी.रोंगे तसेच शैला गोडसे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसापूर्वी समाधान आवताडे व अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे वरिष्ठ नेते आपल्याला पक्षाकडून उभे राहण्यास विचारणा करीत असल्याचे सांगून निवडणुकीत रंग भरण्याचा प्रयत्न केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मात्र  भालके यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नावाबाबत  चर्चा नाही तसेच इतर कोणीही पक्षाकडे तिकीट मागितले नसल्याचे वरिष्टानी सांगितले तर भाजपाने मात्र प्रशांत परिचारक समाधान आवताडे,अभिजीत पाटील बी.पी.रोंगे सर यांनी भाजपाकडे तिकीट मागितल्याचे सांगितले यातील अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले समाधान आवताडे यांनी गत विधानसभा निवडणूकीत मंगळवेढा तालुक्यातून प्रथम क्रमांकाची मते मिळवल्यामुळे त्यांच्या आशा-आकांक्षा वाढल्या असल्या तरी त्यांच्या उमेदवारीबाबत कोणाकडून लढणार हे अद्याप स्पष्ट नाही त्यांच्या गेल्या काही आठवड्यातील वाढत्या मुंबई दौर्यामुळे पक्षीय पातळीवर तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाणवत आहे समाधान आवताडे यांना गतवेळी त्यांचे चुलते तालुक्याचे ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या संपर्काचा मोठा फायदा झाला होता परंतु यावेळी मात्र त्यांचे गणित चुकणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे याचे कारण असे की समाधान आवताडे यांचे चुलत बंधू व बबनराव आवताडे यांचे पुत्र खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे हे देखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याचे समजते त्यादृष्टीने त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जावून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत पहिली फेरी पूर्ण केली आहे तर ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी दि.23 पासून स्वतः  निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच बाहेर पडले आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षात प्रथम विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपले पुत्र सिद्धेश्वर आवताडे यांना निवडणुकीत उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत आज त्यांनी आंधळगाव,लक्ष्मीदहिवडी गुंजेगाव  या गावांना भेटी दिल्या व मनोगत जाणून घेतले बबनराव आवताडे यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते तयार केले असून त्यांना मानणारा एक गट निर्माण केला आहे दर निवडणुकीत त्यांच्या भूमिकेला विशेष महत्व असते तसेच त्यांचे पुत्र सिद्धेश्वर आवताडे यांचा देखील जनसंपर्क दांडगा असून त्यांनी युवकांची मोठी फळी उभी केली आहे तसेच बबनराव आवताडे यांनी सहकाराच्या जाळ्यातून अनेक लोक जोडले असून त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होणार आहे गत निवडणुकीत ही सर्व ताकद त्यांनी समाधान आवताडे यांच्या पाठीशी लावल्याने तालुक्यातुन इतर उमेद्वारापेक्षा प्रथम क्रमांकाची मते त्यांना मिळाली होती.

                पंढरपूर तालुक्यातुन समाधान आवताडे यांना अपेक्षित मतदान न झाल्याने त्यानं मतदार संघात तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागले होते परंतु या पोटनिवडणुकीत त्यांचे चुलते व सहकारातील जाणते बबनराव आवताडे यांनी आपल्या मुलासाठी विधानसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केल्यामुळे समाधान आवताडे यांच्यापुढे अडचणी निर्माण होणार असून गेल्यावेळी एवढे मताधिक्य टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांना राहणार आहे समाधान आवताडे यांना  सध्या उमेदवारी बाबत अनिश्चितता असताना घरातूनच होणारा विरोध कसा झेलणार याकडे येथील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे

Pages