वाळू वाहतूक करताना पोलिसांनी पिक अप पकडला,अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल..... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, March 18, 2021

वाळू वाहतूक करताना पोलिसांनी पिक अप पकडला,अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल.....

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

          

             माण नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना देगाव हद्दीत महिला पोलिस उपनिरिक्षक प्रणोती यादव यांनी पकडून  1 लाख 3 हजाराचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात वाहनचालकाविरूध्द वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           या घटनेची हकिकत अशी,दि.17 च्या पहाटे 4.00 च्या दरम्यान देगाव गावच्या हद्दीतील वेलकम हॉटेलच्या पाठीमागील बाजूस ढेकळेवाडी जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर बिगर नंबरचा वाळूने भरलेला पांढर्‍या रंगाचा महिंद्रा पिक अप रात्रीची गस्त घालत असताना महिला पोलिस उपनिरिक्षक प्रणोती यादव यांनी वाळू घेवून जात असताना पकडला. 


            अंधाराचा फायदा घेवून चालक जागेवर वाहन सोडून फरार झाला आहे.याची फिर्याद पोलिसात दाखल केल्यानंतर अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नव्याने कार्यभार स्विकारलेल्या डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी अवैध वाळू व इतर बेकायदा धंदे याविरूध्द मोहिम उघडल्याने  रात्रभर माण व भिमा नदीतून बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Pages