मंगळवेढा शहरात तीन ठिकाण मटका अड्यावर छापे टाकून 24 हजार 780 रूपयांचा मुद्देमाल जप्त.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, March 17, 2021

मंगळवेढा शहरात तीन ठिकाण मटका अड्यावर छापे टाकून 24 हजार 780 रूपयांचा मुद्देमाल जप्त....


नव्याने रूजू झालेल्या महिला डीवायएसपींचे अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरू,अवैध व्यवसाईकांचे दनानले धाबे


दिव्य न्यूज नेटवर्क 


            मंगळवेढा शहरात विविध ठिकाणी व्हॉटसअपव्दारे लोकांकडून पैसे लावून कल्याण नावाचा मटका खेळत असताना मिळून आल्याप्रकरणी पोलीसांनी समाधान भोसले,किशोर परचंडे,दिगंबर कुलकर्णी अहमद इनामदार,लक्ष्मीकांत जाधव या चौघांविरूद्ध मुंबई जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करून 24 हजार 780 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.दरम्यान,नव्याने कार्यभार स्विकारलेल्या प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी अवैध धंद्याविरूद्ध कारवाईची मोहीम उघडल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

               मंगळवेढा शहरात मटका बोकाळल्याची गोपणीय माहिती मिळताच डीवायएसपी पाटील यांना मिळताच सहाय्यक फौजदार राजेंद्र जावळे,दत्तात्रय तोंडले,महिला पो.ना.वंदना अहिरे यांचे पथक तयार करून कारवाईचे फर्मान काढले.हे पथक शहरातील चोखामेळा चौकातून मुरलीधर चौकाकडे जात असताना पायी जात असताना दिगंबर पांडूरंग कुलकणी हा इसम काहीतरी आकडेमोड करीत असताना पथकास दिसले.पोलीसांनी या छापा प्रसंगी त्याच्याकडून 2600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

             


              ही कारवाई दिनांक 15 रोजी सायंकाळी 6.40 वाजता करण्यात आली.सदरचा मटका कोणास देतो असे विचारले असता अहमद अजीज इनामदारकडे देत असल्याचे सांगतले.याच पथकाने शहरातील आठवडा बाजारातील दत्त पान शॉपसमोर आरोपी समाधान अर्जन भोसले व किशोर परचंडे हे येणार्‍या - जाणार्‍या लोकांकडून मोबाईलच्या व्हॉटसअ‍ॅपव्दारे कल्याण मटका घेताना मिळून आले.या छाप्याप्रसंगी पोलीसांनी 4 हजार 480 रूपये रोख रक्कम व 4000 रूपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे.ही कारवाई दि.15 रोजी सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आली.

              तिसर्‍या छाप्यात शहरातील जुनी कडबे गल्ली येथे एका पत्रा शेडमध्ये लक्ष्मीकांत वसंत जाधव हा विनापरवाना बेकायदा ऑनलाईन जुगार खेळत असताना पोलीसांना मिळून आला.पोलीसांनी त्याच्याकडून प्रिंटर,कॉम्प्युटर व रोख 3 हजार 700 असा एकूण 13 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याची फिर्याद पो.शिपाई संतोष चव्हाण,मनोहर भोसले,सुनिल पवार यांनी दाखल केली आहे.दरम्यान,मंगळवेढयात प्रथमच एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकण्याची ही पहिलीच घटना आहे.

Pages