मंगळवेढ्याचे डी.वाय.एस.पी.यांची सेवानिवृतीच्या ताेंडावर अन्यत्र बदली - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, March 4, 2021

मंगळवेढ्याचे डी.वाय.एस.पी.यांची सेवानिवृतीच्या ताेंडावर अन्यत्र बदली


दिव्य न्यूज नेटवर्क

               मंगळवेढयाचे उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून राजश्री संभाजीराव पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने केली असून येथील उपविभागिय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून तीन महिने सेवानिवृत्तीस  असताना ही बदली झाली आहे.

           


             महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने राज्यातील  ७ परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक या संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यात मंगळवेढा येथे उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून राजश्री संभाजीराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दत्तात्रय पाटील हे 27 फेब्रवारी  2019 मध्ये मंगळवेढयात रूजू झाले होते.दिनांक 31 मे 2021 रोजी ते सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांची त्यापुर्वीच अन्यत्र बदली झाली आहे.

            सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रिया झाल्याची चर्चा नागरिकामधून केली जात आहे.

Pages