मंगळवेढा तालुक्यातील 118 शेतकर्‍यांचे खाते नंबर जुळत नसल्याने 4 लाखाचे अतिवृष्टीचे अनुदान पडून.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, February 24, 2021

मंगळवेढा तालुक्यातील 118 शेतकर्‍यांचे खाते नंबर जुळत नसल्याने 4 लाखाचे अतिवृष्टीचे अनुदान पडून....

 

दिव्य न्यूज नेटवर्क

            मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 118 शेतकर्‍यांनी बँक खाते क्रमांक चुकीचे दिल्याने 4 लाख अनुदान परत आल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.मंगळवेढा तालुक्यात ऑक्टोबर अतिवृष्टी होवून पिकांचे नुकसान झाले होते.शासनाकडून या नुकसानीपोटी मंगळवेढा तालुक्याला 20 कोटी 36 लाख 18 हजार अनुदान प्राप्त झाले. एकूण 42 हजार नुकसानग्रस्त शेतकरी खातेदार आहेत. यार्पैकी 118 शेतकर्‍यांचे खातेक्रमांक जुळत नसल्याने 4 लाख अनुदान वाटपाविना पडून आहे.

         हे सर्व खातेदार आंधळगांव,अरळी,आसबेवाडी,बठाण, भालेवाडी,भोसे,ब्रह्मपुरी,डोणज,डोंगरगांव,फटेवाडी,घरनिकी,गोणेवाडी,गुंजेगाव,हाजापूर,हिवरगांव,जालिहाळ,कचरेवाडी,कर्जाळ,कात्राळ,खोमनाळ,खुपसंगी,लक्ष्मीदहीवडी,लेंडवे ,चिंचाळे,माचणूर,मंगळवेढा,मारापूर,मारोळी,मुंढेवाडी,नंदून,निंबोणी,पाटखळ,रहाटेवाडी,सलगरखुर्द॥,सिद्धापूर,सोड्डी,तळसंगी,उचेठाण आदि गावातील आहेत.



          हे अनुदान महाराष्ट्र बँकेत पाठविण्यात आले होते मात्र खाते नंबर चुकीचे असल्याने सदर शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले.अनुदान वाटपासाठी महसूल सहाय्यक महावीर माळी प्रयत्न केले.

Pages