मंगळवेढयातील मुलींचे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथक कार्यरत.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, February 9, 2021

मंगळवेढयातील मुलींचे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथक कार्यरत....


दिव्य न्यूज नेटवर्क

          मंगळवेढा शहरातील मुलींचे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथक सदैव तत्पर असून छेडछाडीचा प्रकार घडल्यास टोल फ्री क्रमांक 1091 वर आपली तक्रार कळवावी असे आवाहन निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरिक्षक प्रणोती यादव यांनी केले आहे.

             

मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित केलेल्या निर्भया पथकाची माहिती देताना त्या बोलत होत्या.व्यासपीठावर सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुजीत कदम,वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण संपांगे,प्राचार्य शिवाजी चव्हाण,उपप्राचार्या तेजस्विनी कदम आदी होते.पोलिस उपनिरिक्षक यादव पुढे म्हणाल्या,2016 मध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी निर्भया पथकाची प्रथम स्थापना केली.तदनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पथकाची निर्मिती करण्यात आली.

                पाेलीस अधिक्षक तेजस्वनी सातपुते,अतिरिक्त पाेलीस अधिक्षक अतूल झेंडे,डी.वाय.एस.पी.दतात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निर्भया पथकामध्ये एक महिला पोलिस उपनिरिक्षक,दोन महिला पोलिस कर्मचारी,दोन पुरुष कर्मचारी असे पाच जणांचे हे पथक असून मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्यात छेडछाड करणार्‍यांवर करडी नजर ठेवणार आहेत. मुलींची छेडछाड होण्याची शक्यता ज्या ठिकाणी असेल अर्थात शाळा,कॉलेज,बसस्थानक परिसर या ठिकाणी हे पथक पेट्रोलिंग करणार आहे.मुलींची छेडछाड केल्यास त्या युवकास ताब्यात घेवून प्रथमतः त्याच्यावर पहिला गुन्हा म्हणून पोलिस कर्मचारी समुपदेशन करतील या समुपदेशनामध्ये एक डॉक्टर,एक वकिल यांचा समावेश असेल समुपदेशानंतरही पुन्हा त्या युवकाने कृत्य केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या कारवाईची नोंद पोलिस स्टेशन दप्तरी झाल्यानंतर शासकीय नोकरीच्यावेळी हे अडचणीचे ठरणार आहे.

                    यासाठी कॉलेज युवकानी कुठल्याही मुलींची छेडछाड करू नये असे आवाहनही महिला पोलिस उपनिरिक्षक यादव यांनी केले.दरम्यान  निर्भया पथकाच्या मदतीसाठी शाळा कॉलेजमधील काही निवडक मुलींची निर्भया सखी म्हणून निर्भया सखी म्हणून निवड केली जाणार आहे.कॉलेज आवारात छेडछाडीचे प्रकार झाल्यास मुली निर्भया सखीकडे तक्रार करतील.तसेच शाळा कॉलेजमध्ये तक्रार पेटी ठेवली जाईल.या पेटीत मुलींनी  आपल्या तक्रारी टाकावयाच्या आहेत.तक्रारीबाबत व्हॅाटसअ‍ॅप नंबरही देण्यात येणार असून त्यावर आपल्या तक्रारी नोंदवू शकता असे यादव म्हणाल्या.कार्यक्रमाला पर्यवेक्षक राजू काझी,सुनिल नागणे,विजय पानसरे,प्रियांका सुर्यवंशी,चन्नाप्पा म्हेत्रे,सर्जेराव वाघमोडे,तानाजी मुदगूल,अब्दुल खतीब,प्रशालेतील  शिक्षक,शिक्षिका,विदयार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Pages