सावधान... चोरटयांनी कुटुंबियांना घरात कोंडून 51 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल.. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, February 10, 2021

सावधान... चोरटयांनी कुटुंबियांना घरात कोंडून 51 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल..


दिव्य न्यूज नेटवर्क

                 आंधळगाव येथे चोरटयांनी  घरात झोपलेल्या कुटुंबियांच्या खोलीला बाहेरून कडी लावून शेजारच्या खोलीतील कपाटात ठेवलेले चांदीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 51 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारच्या पहाटे घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

               

या घटनेची हकिकत अशी यातील फिर्यादी मारुती रामचंद्र मोरे  दि. 8 रोजी कुटुंबियासह जेवण करून घरात दहा झोपले होते. त्यांच्या शेजारच्या खोलीत त्यांचे भाऊ व कुटुंबिय झोपले होते.  या खोलीत मांजरीण व्याल्याने आत बाहेर करत असल्यामुळे एका खोलीचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. दि.9 च्या पहाटे 3.00 वा. फिर्यादी  लघुशंकेसाठी उठले असता दरवाजा उघडत नसल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी त्यांच्या भावाला मोबाईलवर फोन करून बाहेरून दरवाजाला कोणीतरी कडी लावली आहे ती उघड असे सांगून कडी उघडली असता  खोलीतील कपाटातील सामान अस्ताव्यस्त स्थितीत पडल्याचे दिसून आले.

               कपाटात पाहिले असता दि.31 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच 20 हजार रुपये रोख चलनी नोटा कपाटात नसल्याचे दिसून आले.त्याचबरोबर खुपसंगी शिवारातील बबन नामदेव कदम यांच्याही घरी चोरटयांनी घरफोडी केल्याचे फिर्यादीस समजले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Pages