मंगळवेढा ब्रेकिंग:-बेकायदा धंदे कधी बंद होणार? मंगळवेढेकराचा प्रशासनाला सवाल.! - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, February 7, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग:-बेकायदा धंदे कधी बंद होणार? मंगळवेढेकराचा प्रशासनाला सवाल.!

 

दिव्य न्यूज नेटवर्क

         सोलापूर पोलिस अधिक्षक तेजस्वनी सातपुते यांनी कार्याभार स्विकारल्यानंतर  प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना देऊन ही मंगळवेढा शहरात मात्र खुले आम मटका  सुरू असल्याचे मटक्या चिट्टीवरुन दिसुन  येत असल्याने कोण म्हणतय  मटका बंद? हा घ्या त्याचा  पुरावा असा सवाल जनतेमधून केला जात आहे.पाेलीस अधिक्षक यावर काय कारवाई करनार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. 

            

लाँकडाऊन  कालावधी मध्ये मटका बंद असल्याने गोरगरीबांचे संसार सुरळित चालू असल्याने  समाधान व्यक्त होत होते.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काहीने मध्यस्थित करून मटका सुरु केला.आज हा मटका शहरातील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बस स्थानक परिसर ,दामाजी रोड,नवीन भाजी मंडई ,शिवप्रेमी,चोखामेळा चोक,बोराळ नाका,जुनी भाजी मंडई,व खोमनळ नाका परिसरात चोरी चोरी छुपके छुपके  चालणारा खुले आम पद्धतीने मटका डोके वर काढु पाहत आहे. पंढरपूर उपविभागीय पोलिस कार्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांने  मंगळवेढा शहरात येऊन बाजार चौकात चालणाऱ्या मटका  घेणाऱ्या दोघा विरोध गुन्हा दाखल केला हाेता.  मटका व्यवसाकांना पोलिस अधिकारी यांची भिती राहलेली नाही.परिणामी दुसऱ्या दिवशीच मटक्याच्या चिट्टीया प्रसार माध्यमाच्या हाती लागली आहेत .

              या चिट्टी वरुन मटका सुरू असल्याचे उघड झाले आहे. तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी त्याच्या कालावधीत मटका हदपार केल्याने मोडकळीस अलेले गोरगरीबांचे संसार पुन्हा नव्या जोमाने उभारण्यात आल्याने महिला वर्गातून त्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत होते. मटका  खेळणारानां ताे आशा लावून गिळू पाहत असल्याने अनेकांनाचे संसार रस्त्यावर आले आहेत. प्रामुख्याने या व्यवसाय मध्ये गरीब मजूर वर्ग भरडला जाऊन त्यांच्या नशीबी दारिद्रय येऊ पाहत असल्याचे चित्र आहे.

                मंगळवेढा शहरात तिघे बुकी चालक आहेक कारवाईत मात्र प्रत्यक्षात ऐजंटदारांना बळी दिले जात असल्याने झाडांचा बुंधा ठेवून केवळ फांद्या छाटण्याचे काम पोलिस प्रशासन करित असल्याच्या तिखट प्रतिक्रिया नागरिकांना मधून व्यक्त आहेत.  कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते  काय  कारवाई करणार याकडे तमाम मंगळवेढा शहरवासियचे लक्ष लागले आहे.

     


मंगळवेढा शहरातील मटका  चिठ्ठी चा  पुरावा छायाचित्रात दिसत आहे.

Pages