पंढरपूर-विजयपूर रेल्वे यंदाच्या अर्थसंकल्पात धावणार का.? - Divyaprabhat News

Breaking News

Friday, February 19, 2021

पंढरपूर-विजयपूर रेल्वे यंदाच्या अर्थसंकल्पात धावणार का.?

 

अर्थसंकल्पात तरी याप्रश्नी  विचार होणार का ? असा प्रश्न तालुक्यातून विचारला जात आहे


दिव्य न्यूज नेटवर्क

     कर्नाटकातील भाविक पंढरपूर शी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गाचा सर्वे होऊन राजकीय अनास्थामुळे रखडत चालला आहे यंदाच्या अर्थसंकल्पात तरी याप्रश्नी  विचार होणार का ? असा प्रश्न तालुक्यातून विचारला जात आहे

             पंढरपूर च्या विठूरायाच्या भेटीसाठी  महाराष्ट्र बरोबर सर्वाधिक जास्त भाविक कर्नाटकातून चालत येतात परंतु त्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर विजयपूर हा 108 कि.मी.चा रेल्वेमार्ग  2014-15 मध्ये मंजूर करून घेतला.त्यासाठी 1294 कोटी खर्च अपेक्षित होता. परंतु त्या मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गासाठी निधी दिला नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप रेंगाळलेल्या अवस्थेत आहे या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी  लागल्यास आणि पंढरपूर- लोणंद रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूर मार्गे वाढणारे अंतर व खर्च,वेळेची बचत होणार आहे.शिवाय पंढरपूर -मंगळवेढा या परिसरातील द्राक्षे,डाळींब,ज्वारी,साखर, व इतर शेतमाल दक्षिण व उत्तर भारतामध्ये पाठवणे शक्य होणार आहे. विजयपूर -पुणे  हे अंतर 374 किलोमीटर आहे व 314 कि.मी होताना 60 कि.मी अंतराची बचत पंढरपूर मार्गे होणार आहे. सुशील कुमार शिंदे यांच्यानंतर खा. शरद बनसोडे यांनी नेटाने प्रयत्न करणे आवश्यक होते परंतु त्यांनी देखील त्यामध्ये म्हणावे तसे लक्ष दिले नाही विद्यमान  उच्चशिक्षित खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित असताना त्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वराचे नाव देण्यासंदर्भातील मागणी यापूर्वीच केली तर पंढरपूर व फलटणच्या रेल्वेमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याची व लावण्याची विनंती केल्याचे माध्यमात आले पण पंढरपूर विजयपूर साठी कुठे माशी शिंकली हे तेच जाणे त्यांच्या मतदारसंघात असलेल्या पंढरपूर विजयपूर रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा अपेक्षित होता परंतु दुर्दैवाने त्या संदर्भात काही प्रयत्न केल्याचे दिसले नाही.स्व आ. भालके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे राज्यमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे इंग्रजीत पत्रव्यवहार करून त्यासंदर्भातील हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली या पत्राला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दि.4 सप्टेंबर 20 रोजी उत्तर देत नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यासंदर्भात संबंधित रेल्वे  बोर्ड संचालकाला पत्राद्वारे दिले परंतु स्व.भालकेच्या अकाली जाण्याने आता या प्रश्नी पाठपुरावा कोण करणार असा प्रश्न देखील निर्माण झाला.असला तरी याप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता निर्माण झाली.

       


               सदर रेल्वेमार्गासाठी विजापूर व जतच्या लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे तसा पाठपुरावा सोलापूरातील खासदार,स्थानिक आमदारांनी केल्यास आणखीन गती मिळू शकते. या मार्गाचे अंतर  108 कि.मी. ऐवजी  जवळपास 85 किलोमीटर इतके होत असून त्याचा खर्च एक हजार कोटी आसपास होऊ शकतो त्यासाठी कोकण रेल्वे प्रमाणे राज्य शासनाने यामध्ये आर्थिक हातभार लावला तर हा प्रश्न मार्गी लावू शकतो असे मत रेल्वेचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आता गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची

               वर्षभरापासून भारत भालके यांनी पाठपुरावा सुरू केला परंतु त्यांच्या अकाली जाण्याने हा रखडलेला विषय भगीरथ भालके यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यापर्यंत तात्काळ नेऊ.मुजमिल काझी शहराध्यक्ष राष्ट्रवादी

Pages