ब्रम्हपुरी केेंद्रीय शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, February 17, 2021

ब्रम्हपुरी केेंद्रीय शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न...


मंगळवेढा/प्रतिनिधी 

             ब्रम्हपुरी येथील जि.प.शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद शनिवारी भरविण्यात आली.दरम्यान  ब्रम्हपुरी केंद्रांतर्गत येणार्‍या सर्व शाळांनी यामध्ये सहभाग नोंदविला.पं.स.चे विस्ताराधिकारी बजरंग पांढरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.प्रास्ताविकात केंद्र प्रमुख रामराव पाटील यांनी माहे जानेवारी 2021 अखेरचा शैक्षणिक कामकाज व शाळानिहाय प्रगतीचा आढावा प्रास्ताविकात सादर करून कार्यक्रमाची विषय पत्रिका वाचून दाखविली. यामध्ये शालाबाह्य व स्थलांतरीत मुलांच्या सर्वेक्षणाबाबत नियोजन,तंबाखुमुक्त अभियान आदी मार्गदर्शन करून शासकीय परिपत्रकांचे वाचन केले.

                 

 विस्ताराधिकारी पांढरे यांनी शाळानिहाय कामकाजाचा आढावा घेतला.मुलांना आनंददायी शिक्षण दया,पुस्तकाशिवाय मुले अभ्यास करत नाहीत.नविन शैक्षणिक अ‍ॅप डाऊनलोड करून विदयार्थ्याना दर्जेदार शिक्षण मिळविण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील असावे.आपल्या वर्गात प्रगती होईल यासाठी नवनवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा.तसेच शिष्यवृत्ती परिक्षेस जास्तीत जास्त विदयार्थी बसवून गुणवत्ता यादीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.

               या शिक्षण परिषदेत गणित,विज्ञान,इंग्रजी या विषयावर शिक्षक निंगप्पा बिराजदार,शिक्षिका सुजाता पुजारी,अशोक इंगळे,कविराज दत्तू,मनोहर पवार,नदाम मेहेजबीन आदी शिक्षकांनी यावेळी अध्यापनातून मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी ब्रम्हपुरीचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. तर शिक्षक सतीश पवार यांनी आभार मानले.कार्यक्रमाला केंद्रातील सर्व शिक्षक,शिक्षिका उपस्थित होत्या

Pages