जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंगळवेढा पंचायत समितीस धावती भेट.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 30, 2021

जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंगळवेढा पंचायत समितीस धावती भेट....

 

दिव्य न्यूज नेटवर्क

                मंगळवेढा पंचायत समिती कार्यालयास सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथमच शुक्रवारी भेट दिली.दरम्यान,ही धावती भेट असल्याने या भेटीदरम्यान पंचायत समितीच्या नवीन इमारतीबाबत चर्चा करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा आज सांगोला येथे दौरा होता.        

             

सायंकाळी चार वाजता सोलापूरकडे जात असताना त्यांनी मंगळवेढा पंचायत समिती कार्यालयास भेट दिली.यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या इमारतीची पाहणी करून येंथील अडचणी जाणून घेतल्या.सध्याची इमारत ही खूप जुनी असून वाढता कामकाजाचा विस्तार पाहता सध्या ही इमारत अपुरी पडत असल्याने नवीन इमारत बांधण्यासाठी 4.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.सध्या जागा उपलब्ध नसल्यामुळे इमारत कोठे बांधावयाची यावर  प्रश्नचिन्ह उभे आहे.नवीन तहसील कार्यालय परिसरात जागा उपलब्ध आहे मात्र अदयाप ती फायनल झाली नाही. याबाबत प्रांताधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे.येथील जागा उपलब्ध झाल्यास न्यायालय,ग्रामीण रुग्णालय,तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय ही सर्व कार्यालये एकत्र येत असल्याने  ग्रामीण भागातून कामासाठी येणार्‍या नागरिकांना सोयीचे होणार आहे.पंचायत समितीची नवीन इमारत ही  तहसील कार्यालय इमारतीसारखीच असणार असून यामध्ये वॉल कंपौंड,टॉयलेट याचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.

            मंगळवेढा पंचायत समितीची हीच ती अपुरी पडत असलेली इमारत छायाचित्रात दिसत आहे.

Pages