बेगमपुर ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले,मतदान होनार उमेदवार पाहुन..... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 9, 2021

बेगमपुर ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले,मतदान होनार उमेदवार पाहुन.....


बेगमपुर/प्रतिनिधी

                     बेगमपुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असुन या ना त्या कारणांमुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे.सध्या दोन्ही पॅनलमधील उमेदवाराबद्ल विविध चर्चा नागरीकांमधुन होत आहेत.यातील प्रमुख चर्चेचा विषय म्हणजे दोन्ही पॅनलमधील उमेदवारांबाबत जनतेमधुन चाचपणी होताना दिसत आहे.

             


                या चाचपणी मुळे पार्टीच्या राजकारणात जनतेला स्वारस्य राहिल्या सारखे दिसत नाही.घोडेश्वर ग्रामविकास आघाडी आणि आदर्श ग्रामविकास पॅनल या दोन्ही पॅनलमधील उमेदवाराची निवड करत असताना पार्टी प्रमुखांनी सर्व निकषांवर उमेदवारांची पारख तर केलीच असणार पण ही पारख जनतेलाही आवडली पाहिजे हे ही तितकेच सत्य.सद्यस्थीती पाहता घोडेश्वर ग्रामविकास आघाडीची जमेची बाजु जर पाहीली तर या आघाडीमध्ये युवा उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व उमेदवार सर्व सामान्य परीवारातील आहेत.

                त्यामुळे घोडेश्वर ग्रामविकास आघाडी कडील उमेदवारांना जो सर्वसामान्य चेहरा लाभला आहे ही बाब जमेची बाजु ठरु शकते अशी नागरीकां मधुन  होत आहे.तर आदर्श ग्रामविकास पॅनल मधील उमेदवारांची निवड तोडीस तोड झाली आहे यात दुमत नाही जनता जनार्दन कोणाला स्विकारणार याबाबत सांगणे कठिण आहे. परंतु सामान्य परीवार आणि वलायंकित परीवार अशी ज्या ज्या वार्डमध्ये दरी आहे ही दरी सर करून मतदार राजा कोणावर प्रसन्न होईल याबाबत जनता मात्र सतर्क असणार हे नक्की आहे .कारण जो तो सध्या आपलीच बाजु भक्कम असल्याचा जो दिखावा करत आहे यावरुन एकच लक्षात येते कि बेगमपुरची जनता खुपचं सुज्ञ असुन आतापर्यंत तर सर्वांना आश्वासन देण्यात तिने यश मिळवले आहे.एकुणच उमेदवार निवडीमधील जी सतर्कता दोन्हीकडील पॅनलप्रुमखांनी दाखवली आहे या सतर्कतेचा फायदा नेमका कोणाला होईल हे जनताच ठरवणार.....

Pages