निवडणूकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा,तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांच्या सूचना..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, January 11, 2021

निवडणूकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा,तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांच्या सूचना.....


दिव्य न्यूज नेटवर्क

                   पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 348 मतदान केंद्र  होते त्यापैकी एकूण 17 वार्ड बिनविरोध झाल्याने 331  मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार असून, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सर्व मतदान प्रक्रिया जबाबदारीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी विवेक सांळुखे यांनी दिल्या.  

             पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन शासकीय धान्य गोदाम, अनवली ता.पंढरपूर येथे नियुक्त 1 हजार 736 अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांना आज दुसरे प्रशिक्षण दोन सत्रात देण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे,महसूल सहाय्यक एस.आर.कोळी,यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

             


                 निवडणूक नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी  प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आलेल्या समस्यांचे निराकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच टपाल मतदानासाठी मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांना जवळपासच्या गावात नियुक्त केले जाणार असून, त्या अनुषंगाने योग्यती कार्यवाही  करुन त्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे.यासाठी संबधितांना  एक तासाची मुभा देऊन त्या अनुषंगाने आवश्यकती मदत केली जाणार आहे. जेणे करुन मतदान कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार याची दक्षता घेण्यात आली असल्याचे तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी यावेळी सांगितले.

           


                मतदान साहित्य स्विकृतीपासून मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान घेताना घ्यावयाची खबरदारी, विविध संवेधानिक, असंवेधानिक लिफाफे, अर्ज भरणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट जोडणी, प्रत्यक्ष मतदान करतांना मतदान यंत्रात बिघाड झाल्यास तात्काळ करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदींबाबत  माहिती निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी दिली. तसेच प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याबाबत उपस्थित शंकाचे समाधानही यावेळी करण्यात आले.

Pages