घोडेश्वर-बेगमपुर ग्रामपंचायतीचा कोण होणार किंग आणि कोण होणार किंगमेकर.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, January 8, 2021

घोडेश्वर-बेगमपुर ग्रामपंचायतीचा कोण होणार किंग आणि कोण होणार किंगमेकर....


बेगमपुर/प्रतिनिधी

                  संपुर्ण जिल्हाभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा प्रोग्राम जाहीर झाला असुन सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागाची राजधानी आसणा-या व  राजकीय दृष्ट्या महत्वाची असणारी घोडेश्वर ग्रामपंचायत यंदा कुणाकडे जाणार यांची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्यातील व तालुक्यातील राजकीय मातब्बरांना लागली आहे.एकुण तेरा सदस्य संख्या असणा-या या ग्रामपंचायतीच्या २०१५ च्या निवडणुकीमध्ये राजकीय दृष्ट्या नवख्या असणा-या तिसऱ्या आघाडीने आठ जागावर विजय मिळवुन येथिल प्रस्थापित राजकीयांना आस्मान दाखवले होते.


              वास्तविक पाहता ही तिसरी आघाडी म्हणजे इथल्या पारंपारिक राजकारण्यांच्या विरोधात बंड करून इथल्या राजकारणात नविन पर्व सुरू करण्याचा संकल्प पॅनलप्रमुख आप्पा पाटील आणि त्यांच्या युवा शिलेदारांनी केला होता.याच बळावर आघाडीच्या नेतृत्त्वाखाली अनेक अडचणीवर मात करत संपूर्ण पाच वर्षांची सत्ता सरपंच हारीभाऊ काकडे यांनी पुर्णत्वास नेली.मागिल निवडणुकीचा विचार केला तर नवखी तिसरी आघाडी, संजय विभुते यांचा पारंपारिक पॅनल, अस्लम चौधरी यांनी काकडे पॅनल मधुन बंड करून पहिल्यांदाच स्थापन केलेला पॅनल,आणि डाॅ. बाळासाहेब सरवळे यांनीही विभुते पॅनलविरूध्द बंड करून ठराविक जागी उभे केलेले उमेदवार असा एकुण अतिशय संम्रभात टाकणारा लढा येथिल जनतेने पाहिला आहे. यामध्ये आघाडीचे (७ )अस्लम चौधरी यांचे( ५  )तर डाॅ.सरवळे यांचा( १) आश्या पध्दतीने उमेदवार विजयी झाले होते.आघाडीचे बहुमत झाले व सरपंच आघाडीचा झाला.यामध्ये अस्लम चौधरी यांचीही पार्टी पहिल्यांदा लढुनही पाच जागांवर विजयी होऊन प्रमुख विरोधक म्हणुन पुढे आले.  इतिहासात डोकावले आसता गेली अनेक निवडणूका येथील जनतेने काकडे पार्टी (निराळं गल्ली) आणि विभुते पार्टी (भूसार गल्ली )आश्याच पाहिल्या होत्या.स्वर्गिय बब्रुवाहन विभुते व स्वर्गिय रामचंद्र काकडे यांच्या टोकाच्या राजकारणाचा इतिहास आणि त्या इतिहासाला प्रमाण मानणारी इथली जनता आता गल्लीच्या राजकारणातुन बाहेर पडत असल्याचं जाणवतं आहे.नेमका हाच धागा पकडत मागिल निवडणूकी मध्ये दोन्ही पार्टीतील नव्या दमाच्या नेत्यांना हे गल्ली प्रेम भावल नाही आणि निष्ठेपेक्षा प्रतिष्ठा मोठी म्हणुन दोन्ही बाजुची भक्कम तटबंदी स्वॷस्तित्वासाठी ढासळलेलीही येथील जनतेने पाहीली आहे.

            सद्य परिस्थिती पाहता जवळ जवळ दोन्ही पॅनलची रणनीती ठरलेली असुन घोडेश्वर ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब तांबोळी, बाळासाहेब सरवळे,संजय विभुते,हारीभाऊ काकडे यांनी भक्कम मोर्चेबांधणी  केली आहे. पाचही वार्डामध्ये घोडेश्वर आघाडीने युवकांना संधी दिली असून सर्व सामान्य कुटुंबातील हे युवक सत्तेत यावेत आणि सर्व सामान्यांना न्याय मिळावा आश्या प्रकारचा अजेंडा जनतेसमोर सादर केला असल्याचे दिसत आहे.तर अस्लम चौधरी यांनीही आदर्श ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून  युवक वर्गाला संधी दिली असुन स्वताही येथील वार्ड क्रमांक तीन मधुन उमेदवारी दाखल केली आहे.

            .या निवडणुकीमध्ये  अस्लम चौधरी यांनी पांडुरंग काकडे यांना बरोबर घेतले असुन त्यांचे बंधु केशव काकडे यांना वार्ड क्रमांक दोनमधुन उमेदवारी दिली आहे.एकूणच या निवडणुकीच्या अनेक वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे आजवरच्या इतिहासात प्रथमच विभुते आणि तांबोळी हे  एकत्रीत येऊन‌ लढत आहेत.तर हारीभाऊ काकडे आणि पांडुरंग काकडे हे प्रथमच राजकीय विरोधक म्हणुन समोर आले आहेच.तसेच वार्ड क्रमांक एक  मधुन जावेद तांबोळी आणि वार्ड क्रमांक तीन मधुन करणं चव्हाण हे सर्वात कमी वयाचे व‌ सामान्य परीवारातील दोन उमेदवार उभे राहिले आसुन त्यांना जनतेची सहानुभूती मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकुणच ही निवडणूक ऐतिहासिक होणार असुन दोन्ही पॅनलमधील राजकीय चाणक्य अत्यंत गुप्तपणे फिल्डींग लावत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे अटीतटीच्या या लढतीमध्ये जनता कुणाच्या पारड्यात मतांचं दान भरभरून टाकेल व विजयी करेल हे  सांगणे सध्या तरी कोणत्या राजकीय तज्ञाला शक्य नाही.....

Pages