देगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महिलांना फळझाडे केली वाटप.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, January 27, 2021

देगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महिलांना फळझाडे केली वाटप....


मंगळवेढा/प्रतिनिधी 

                देगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करून ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करीत महिलांना सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हस्ते फळझाड वाटप करण्यात आले.

                 


         या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण,माजी सभापती प्रदिप खांडेकर,सुधाकर मासाळ,सरपंच राणी ढेकळे,उपसरपंच शरद डोईफोडे,  सदस्य मंगल  बनसोडे,लता बनसोडे,सिंधू डोईफोडे,सुरेश मेटकरी,मधुकर मस्के,ग्रामसेविका राखी जाधव आदी उपस्थित होते.यावेळी  महिला बचत गटांना उमेद अभियानांतर्गत रविंद्र भोसले,लिंगराज शरणार्थी आदीनी मार्गदर्शन केले.

                देगाव ग्रामपंचायतीच्यावतीने प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून महिलांना फळझाडांचे वाटप करताना सभापती प्रेरणा मासाळ,राणी ढेकळे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सरपंच ग्रामसेविका राखी जाधव आदी छायाचित्रात दिसत आहेत.

Pages