मंगळवेढा ब्रेकिंग :- मंगळवेढा तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रभाव वाढतोय!गणेशवाडी येथील 438 कोंबड्या नष्ट... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, January 29, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग :- मंगळवेढा तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रभाव वाढतोय!गणेशवाडी येथील 438 कोंबड्या नष्ट...

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

               मंगळवेढा तालुक्यातील बर्ड फ्लूचा  प्रभाव वाढू लागला असून आज दिनांक 27 रोजी गणेश वाडी येथील 438 कोंबड्या व  15 अंडी नष्ट करण्यात आली आहेत दरम्यान चोखामेळा नगर येथील अहवाल निगेटिव्ह आला असून मारापूर व  भालेवाडी येथील अहवाल अद्याप येथील पशुसंवर्धन विभागाकडे आला नाही.

         

 मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथे बर्ड फ्लू रोगाची लागण  झालेल्या  कोंबड्या सापडल्यानंतर   त्या नष्ट करण्यात आल्या त्यानंतर मारापुर,भालेवाडी ,चोखामेळा नगर, गणेश वाडी येथे ही मृत कोंबड्या आढळून आल्याने या कोंबड्या चा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला दरम्यान चोखामेळा नगर येथील  मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर गणेश वाडी येथील कोंबड्यांचा अहवाल बर्ड फ्लू असल्याबाबतचा आल्याने येथील पशुसंवर्धन विभागाने या भागातील कोंबड्यांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित केली होती या सर्व्हेत त्यांना एक किलोमीटरच्या परिसरात सुमारे 1400 कोंबड्या आढळून आल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागाने येथील कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय घेतला.

             


                दिनांक 27 रोजी येथील 438 कोंबड्या व 15 अंडी नष्ट करून व्यवस्थित रित्या एका खड्ड्यामध्ये पुरून टाकल्या ही कारवाई करण्यासाठी सांगोला दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर मंगळवेढा येथील पशुधन विकास अधिकारी पथक डॉ.पी.व्ही. बाबर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन,डाँ.जी.आर.राठोड पशुधन विकास अधिकारी (विस्तार मंगळवेढा),डाँ.बी.ए.कदम पशुधन विकास अधिकारी मंगळवेढा,डाँ.एस.बी.सलगर नंदेश्वर ,डाँ.आर.एन.बंडगर मरवडे, डाँ.टी.ऐ.भोसले आधळगाव,गणेशवाडी ग्रामसेवक बी.आर.आठराबुध्दे,तलाठी शामबाला कुंभार,ग्रामपंचायत शिपाई अरुण ताणगावडे यांच्यासह 21 जणांच्या पथकाने कोंबड्या नष्ट करण्यासाठी सहभागी झाले होते या कर्मचाऱ्यांना पी.पी.किट व मास्क पुरवण्यात आले होते ही कारवाई सकाळी 11 वाजलेपासून रात्री साडे आठ पर्यंत सुरू होती उर्वरित कोंबड्या नष्ट करण्यासाठी दिनांक 28 व 29 रोजी येथील कर्मचाऱ्यांकडून मोहीम राबवली जाणार आहे मारापूर व  भालेवाडी येथील मृत्यू कोंबड्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसून या अहवालाची प्रतीक्षा येथील पशुसंवर्धन विभागाला आहे मंगळवेढा तालुक्यात बर्ड फ्लू वाढू लागला असून पशुपालक व शेतकरी चिंताग्रस्त आहे

Pages