मंगळवेढा ब्रेकिंग :- माचणूर येथे वाळू चोरी करताना पोलिसांनी ट्रॅक्टर पकडला मालक व चालकाविरूध्द गुन्हा दाखल.. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, January 27, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग :- माचणूर येथे वाळू चोरी करताना पोलिसांनी ट्रॅक्टर पकडला मालक व चालकाविरूध्द गुन्हा दाखल..


दिव्य न्यूज नेटवर्क

           माचणूर येथील भिमा नदीपात्रातील बेकायदा वाळू चोरून घेवून जात असताना ट्रॅक्टर पोलिसांनी पकडून ट्रॅक्टर चालक व मालक यांच्याविरूध्द वाळूचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पोलिसांनी  ट्रॅक्टरसह 3 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.या घटनेची हकिकत अशी,दि.25 रोजी रात्री 2.20 वा.माचणूर भिमा नदीपात्रातून एम एच 13 ए.ए 2827 हा   अर्जून कंपनीचा ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये पाच हजार रुपये किमतीची  एक ब्रास वाळू  चोरून घेवून जात असताना पोलिसांना मिळून आला.पोलिस दिसताच सदर ट्रॅक्टरवरील चालकाने ट्रॅक्टर जागेवर सोडून पलायन केले.त्या ट्रॅक्टर चालकाचा शोध मागील दोन दिवसापासून पोलिस घेत आहेत.मात्र अदयाप पोलिसांना तो सापडू शकला नाही. 

             

पोलिसांनी वाळूसह 3 लाखाचा  ट्रॅक्टर जप्त करून मंगळवेढा पोलिस ठाणे आवारात आणून लावला आहे.या वाळू चोरीची फिर्याद पोलिस  शिपाई राजू आवटे  यांनी दिल्यावर ट्रॅक्टर चालक व मालकाविरूध्द वाळू चोरी व पर्यावरण कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,भिमा व माण नदीपात्रातून मोठया प्रमाणात बेकायदा वाळू उपसा रात्रीच्यावेळी सुरु असताना पोलिस प्रशासन व महसूल विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने शासकीय मुद्देमालाची लयलूट होत आहे.महसूल विभागाने वाळूची चोरी रोखण्यासाठी तलाठयांची पथके करणे अपेक्षीत असताना अदयाप एकही पथक कार्यरत नसल्याने वाळू चोरीला बळ मिळत आहे.शहरात व ग्रामीण भागात बांधकामाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात वाळूचे ढिगारे सुर्योदयापुर्वी येवून पडत असल्याचे नागरिकांच्या दृष्टीस येत आहेत.

            संबंधीत सजेच्या तलाठयांना वाळू चोरी  माहित असतानाही संगनमताने वाळू चोरी होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याकामी लक्ष घालून भिमा व माण नदीपात्रातून होणारी वाळू चोरी तात्काळ थांबवावी अशी मागणी होत आहे.

Pages