चंद्रभागेच्या वाळवंटात घुमला ‘जय हिंद!’ नारा!पंढरीत सामाजिक कार्यकर्त्यांनी निराधार, अपंगांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन! - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, January 26, 2021

चंद्रभागेच्या वाळवंटात घुमला ‘जय हिंद!’ नारा!पंढरीत सामाजिक कार्यकर्त्यांनी निराधार, अपंगांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन!

 

पंढरपूर/प्रतिनिधी 
               आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पंढरीतील कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या तीरावरील निराधार, अपंगांसोबत साजरा करत प्रजासत्ताक दिनानिमित्तचा निराधार अपंग बंधु-भगिणींचा आनंदही द्विगुणीत केला.
           
 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, समाजसेवक स्वप्निल वाघेल्लू (वाघमारे) यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत महाद्वार घाट येथे अंध, अपंग, बेघर, भिक्षेकरी यांना अल्पोपहाराचे वाटप केले. प्रत्येकाच्या हातात तिरंगा देत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटात विठुमाऊलीच्या गजरासोबतच जय हिंद चा नारा सुध्दा आज दुमदुमलेला आढळला.

             
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, समाजसेवक स्वप्निल वाघेल्लू (वाघमारे), महर्षी वाल्मिकी संघ शहर अध्यक्ष सुरज कांबळे, अभिषेक वाडेकर, सागर उपळकर, अनिकेत टमटम आदी उपस्थित.

Pages