दलितमित्र कदम गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, January 24, 2021

दलितमित्र कदम गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न..

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

          इंग्लिश स्कूल,मंगळवेढा येथे दलितमित्र कदम गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत कदम गुरुजी महाविद्यालय  वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रममधून करिअर व रोजगाराच्या संधी या विषयावर एक दिवशीय चर्चासत्र संपन्न झाले.या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ.बापूसाहेब चंदनशिवे,मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख अहमदनगर यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर डॉ.सुभाष कदम,डॉ.मिनाक्षी कदम,श्रीधर भोसले,यतिराज वाकळे,चित्रपट लेखक व दिग्दर्शक बालाजी वाघमोडे,महापारेषणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.मिलिंद आवताडे,पत्रकार डॉ.समीर इनामदार ॲड.नंदकुमार पवार,आप्पासाहेब चोपडे,मारुती वाकडे,राजाभाऊ चेळेकर,नामदेव पडवळे प्राचार्य शिवाजी चव्हाण,जयराम आलदर,कल्याण भोसले,लक्ष्मण नागणे,रवींद्र काशीद,रामचंद्र दत्तू तसेच दत्ता घुले,सुनिल खंदारे,राजू काझी,अजित शिंदे,महादेव कोरे,रमेश पवार,सुनिल नागणे,व्यंकटेश माळी,मोहन विभुते,अशपाक काझी, कैलास रणदिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

         

 या चर्चासत्राचे प्रास्ताविक दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कदम यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून कदम गुरुजीमहाविद्यालयाची स्वायत्ततेच्या दिशेने वाटचाल त्यासाठी केलेला संघर्ष याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.त्यानंतर संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ.मिनाक्षी कदम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि दलितमित्र कदम गुरुजी जन्म शताब्दीनिमित्त सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे कदम गुरुजींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची  माहिती सर्वांना होईल तसेच त्यांचे कार्य आपणास सदैव प्रेरणादायी असेल.त्यानंतर कदम गुरुजी जन्मशताब्दी कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब चोपडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,वृत्तपत्र हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

          आजही वर्तमानपत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे.त्यानंतर पत्रकार डॉ.समीर इनामदार यांनी या चर्चासत्राच्या माध्यमातून उत्कृष्ट पत्रकार कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले.ते म्हणाले की उत्कृष्ट पत्रकार हा विविध क्षेत्रांचा अभ्यास असणारा हवा,पत्रकारांनी समाजाची नाडी ओळखली पाहिजे व त्यानुसार लेखन केले पाहिजे.त्यानंतर त्यांनी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला समर्पक उत्तरे दिली.या चर्चासत्राच्या वेळी प्रा.बालाजी वाघमोडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्यामची मम्मी या नाटकाच्या स्क्रिप्टचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्राध्यापक बालाजी वाघमोडे यांनी कदम गुरुजींची शैक्षणिक व सामाजिक चळवळीविषयी माहिती सांगून त्यांच्या जीवनावर प्रदर्शित होणारा चित्रपट सर्वांसाठी प्रेरणादायी असेल असे ते म्हणाले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख होते वक्ते डॉ.बापू चंदनशिवे यांनी पत्रकारितेचे महत्व सांगून पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे,चांगली पत्रकारिता वाढवण्यासाठी काय करावे याबाबत चर्चासत्रात सर्वांना मार्गदर्शन केले.त्यानंतर या चर्चासत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद आवताडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रकारितेच्या शिक्षणातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत त्यात आपण करिअर केले पाहिजे.आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.चांगल्या कामाची प्रशंसा व अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे हे प्रभावी माध्यम आहे.

               या कार्यक्रमांमध्ये शाहीर धोंडीराम साखरे यांच्या साखरे शाहीचा कार्यक्रम सादर झाला.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा.बालाजी वाघमोडे यांच्याहस्ते स्व.कदम गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शाहीर धोंडीराम साखरे व प्रदीप साखरे या पितापुत्रांनी गायलेल्या मुजरा मानाचा,कदम गुरुजी परतुनी या कदम घराण्यात,याओसाड माळावर यासारख्या अनेक गाण्यांनी कदम गुरुजींचे शैक्षणिक कार्य सर्वांसमोर मांडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बालाजी शिंदे यांनी केले यावेळी सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करत प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी,पत्रकार व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

      दलितमित्र कदम गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात दलितमित्र कदम गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्रा.बालाजी वाघमोडे,डॉ.सुभाष कदम,डॉ.मिनाक्षी कदम,डॉ.बापू चंदनशिवे,डॉ.मिलिंद आवताडे,आप्पासाहेब चोपडे व इतर मान्यवर.


Pages