मंगळवेढा बेकिंग :- चोखामेळा नगर व गणेशवाडी या परिसरात 64 कोंबडया मृत पावल्याने पशुपालकांमध्ये घबराट.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, January 24, 2021

मंगळवेढा बेकिंग :- चोखामेळा नगर व गणेशवाडी या परिसरात 64 कोंबडया मृत पावल्याने पशुपालकांमध्ये घबराट....

 

कोंबडयामागचा काळ.... हटता... हटेना!


दिव्य न्यूज नेटवर्क

              मंगळवेढा शहरालगत असलेल्या चोखामेळा नगर व गणेशवाडी परिसरात 64 कोंबडया मृत पावल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले असून  दिवसेंदिवस मृत कोंबडयांची संख्या वाढत असल्याने  पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे.दरम्यान कोंबडया मृत झाल्यास त्या उघडयावर न टाकता तात्काळ नजीकच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पशुधन विकास विस्ताराधिकारी गोविंद राठोड यांनी केले आहे.

               

मंगळवेढा शहरालगत असलेल्या चोखामेळा नगर परिसरात शुक्रवारी 56 कोंबडया तर गणेशवाडी परिसरात  8 कोंबडया अशा 64 कोंबडया मेल्याचे सर्व्हेमध्ये निदर्शनास आले आहे.या मृत कोंबडयांचे  सँपल तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापुर्वी मारापूर परिसरात 32 व भालेवाडी परिसरात 5 अशा 37 कोंबडया मृत पावल्या असून येथील परिस्थिती आता नियंत्रणाखाली असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.भालेवाडी येथील 10 कि.मी. परिसर सतर्क झोन म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घोषित केले आहे. तालुक्यात 31 पोल्ट्री फार्म असून यामध्ये 31 हजार कोंबडया आहेत.तर एक लाख 27 हजार 700 हया शेतकर्‍यांच्या आहेत. 

             यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पाच टिम तयार केल्या आहेत.तालुक्यात प्रथम जंगलगी येथे कोंबडया मृत पावल्या होत्या.त्यामध्ये 753 कोंबडया मारल्या तर 110 अंडी नष्ट केली असून शासनाकडून या पशुपालकांना मोठया कोंबडीस 90 रुपये तर छोटया पिलास 20 रुपये व प्रति अंडे 3 रुपये प्रमाणे अनुदान सोमवारपुढे वाटप करण्यात येणार आहे.

Pages