जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंगळवेढा नगरपरिषदेस 2 कोटी 5 लाख रुपये मंजूर... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, January 25, 2021

जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंगळवेढा नगरपरिषदेस 2 कोटी 5 लाख रुपये मंजूर...

 

मंगळवेढा/प्रतिनिधी  

           जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंगळवेढा नगरपरिषदेस 2 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर झालेची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य, श्री.अजित रामचंद्र जगताप यांनी दिली.मंगळवेढा शहरातील विविध प्रभागातील कामांना निधी उपलब्ध करणेकरीता मा.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यांत आला होता. पुढील कामाकरीता 2 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यांत आला. सि.स.नं.4457 याजागेवरती आरक्षण क्र.9 संपुर्ण आर.सी.सी कंपौंड घेवून बगीचा विकसीत करणे, शिवप्रेमी चौक ते सावंत साहेब ते खंडोबा गल्ली मंदिरापर्यंत कॉंक्रीट रोड करणे, नागणेवाडी कारखाना रोडवरील दबडे लाकूड अड्डा ते रामकृष्ण नागणे घरापर्यंत गटार करणे, दामाजी गृहनिर्माण संस्थामधील न.प मालकीच्या सि.स.नं.31/8/1 या ओपनस्पेस मध्ये बगीच्या करणे, आत्तार बागवान तांबोळी समाजाचे स्मशानभुमीस आर.सी.सी टेरकेस 2 नग करणे, आत्तार बागवान तांबोळी समाजाचे स्मशानभुमीस पाण्याचा हौद बांधकाम करणे, खोमनाळ नाका सि.स.नं.2864 मध्ये सामाजिक,सांस्कृतीक सभागृह बांधणे, सोलापूर हिंदु स्मशानभुमी कंपौंड वॉल चेन लिंक आणि मारवाडी समाज स्मशानभुमी कट्टे व पेव्हर ब्लॉक बसविणे, बाबासाहेब माने घर ते पिंटु माने व इतर 12 ठिकाणी गटार करणे, मंगळवेढा शहरातील इंगळेवाडा, धोंडीराम राऊत व इतर 14 ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, मंगळवेढा शहरातील सि.स.नं.4526 या जागेतील शाही जामा मस्जिद मुस्लीम समाज येथे पायाभूत सुविधा करणे, मुलाणी गल्ली येथील सि.स.नं.832 या जागेतील इमारती वरती पहिला मजला बांधकाम करणे व इतर सार्वजनिक सुविधा करणे. 

         


            सदर कामे मंजूरी करीता पालकमंत्री श्री.दत्ता (मामा) भरणे यांनी मा.जिल्हाधिकारी श्री.मिलिंद शंभरकर साहेब यांना आदेश दिले व त्यानुसार मा.जिल्हाधिकारी सो, यांनी मंजुरी दिली. सदर कामे मंजुर करणेकरीता राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष दिपक आबा साळुंखे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन श्री.भगिरथ दादा भालके, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस लतिफ भाई तांबोळी, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांचे सहकार्य लाभले.         

              मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव  व नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, बांधकाम समिती सभापती प्रविण खवतोडे, नियोजन सभापती अनिल बोदाडे, महिला व बालकल्याण सभापती भागिरथी नागणे, आरोग्य सभापती संकेत खटके व नगरसेविका अनिता नागणे, नगरसेविका राजश्री टाकणे, नगरसेविका सुमन श्रीरंग शिंदे, नगरसेविका फकीर सब्जपरी अरिफ, नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी, नगरसेविका लक्ष्मी बसप्पा म्हेत्रे, नगसेविका पारूबाई सिद्राम जाधव, नगरसेवक रामचंद्र बळीराम कोंडुभैरी, नगरसेविका निर्मला विष्णुपंत माने, नगसेविका रतन चंद्रकांत पडवळे, नगरसेवक प्रशांत सुभाष यादव, नगरसेवक बशीर हुसेन बागवान, नगसेवक राहुल अशोक सावंजी  यांनी सदर कामे मंजुर करणेसाठी प्रयत्न केले

Pages