महमदाबाद ग्रामपंचायतीवर समविचारी आघाडीचा झेंडा आवताडे गटाचा दारुण पराभव.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, January 18, 2021

महमदाबाद ग्रामपंचायतीवर समविचारी आघाडीचा झेंडा आवताडे गटाचा दारुण पराभव....

 


लक्ष्मीदहिवडी/प्रतिनिधी

        नुकत्याच झालेल्या महमदाबाद शे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पारंपारिक अवताडे गटाच्या दोन पार्ट्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एकत्र आल्यामुळे तरुणांनी गाव पातळीवर समविचारी परिवर्तन आघाडी स्थापन करून निवडणूक लढवली व आवताडे गटाला धक्का देत सर्वच्या सर्व सात जागांवर विजय मिळवला मतदारानी उस्फूर्तपणे तरुणांच्या हाती गावच्या चाव्या देऊन गावच्या विकासाला वाट मोकळी करून दिली आहे .

       


                गावात  पारंपरिक विरोधक असलेल्या दोन पार्टीप्रमुखांनी कुणालाही विश्वासात न घेता मनोमिलन केले ते मनोमिलन गावच्या पचनी पडले नाही त्यामुळे उपसरपंच सचिन बोडके,पत्रकार दत्तात्रय नवत्रे यांनी पुढाकार घेत समविचारी आघाडी स्थापन करून निवडणूक लावली सुरुवातीलाच एक जागा बिनविरोध झाली व त्या सदस्याने समविचारी आघाडीत प्रवेश करत आवताडे गटाविरिद्ध दंड थोपटले.नेते विरुद्ध मतदार झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी तरुणांच्या हाती एकहाती सत्तेच्या चाव्या देत आवताडे गटाला धक्का दिला आहे .

             या निवडणुकीत समविचारी आघाडीला हणमंत आणपट,भीमराव पाटील,दत्तात्रय जुंदळे सर,बसवेश्वर सुडके, योगेश नरळे, दीपक नरळे,दत्तात्रय कारंडे,राजकुमार जुंदळे, मनोहर जुंदळे,म्हमाणे गुरुजी,आण्णाबाळा कांबळे,राजू कांबळे,राजाराम नरळे,गणेश तोडकरी, दादा शिरतोडे,संजय सुडके,मधुकर सुडके,प्रकाश जुंदळे, प्रशांत शिलवंत,तमा जुंदळे,प्रकाश मेंटकुटे, गणेश पाटील,चंदू सुडके,यांच्यासह ज्ञात अज्ञात अनेक तरुणांनी,मतदारांनी या आघाडीला साथ देत विजयाचा गुलाल उधळला उमेदवार निवडून आल्यानंतर गुलालाची उधळण करताना कार्यकर्ते विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते आण्णासाहेब सुडके(१४०),मयुरी बोडके(१४२),पद्मिनी म्हमाणे(१३५),संतोष सोनवणे(९०),सुवर्णा नवत्रे(१८०),सरिता सुडके(१७१),स्वाती बसवेश्वर सुडके बिनविरोध.

Pages