आनंदाची बातमी..! मंगळवेढ्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 100 कोरोना योद्ध्यांना दिली लस.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 16, 2021

आनंदाची बातमी..! मंगळवेढ्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 100 कोरोना योद्ध्यांना दिली लस..

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

                      जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त असताना कोरोनाला रोखन्यासाठी तब्बल 10 महिन्यानी निर्माण झालेली कोरोना लस  केंद्र व राज्यसरकारकडून  मंगळवेढा येथे दाखल झाली  ही लस पहिल्यांदा आरोग्य विभागाशी सम्बधित कोरोना योध्याना लस उपलब्ध करून दिली असून मंगळवेढा तालुक्यात आज दि 16 रोजी जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते  ल दहिवडी येथील आशा वर्कर उज्वला कोष्टी यांना प्रथम लस  देऊन लसीकरणास प्रारंभ केला.

               


   मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी  कोविशिल्ड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. लसीकरण मोहिमेसाठी एकूण 953 डॉक्‍टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांची नोंदणी करण्यात आली आहे. सध्या त्यापैकी ग्रामीण रुग्णालयात एकूण 520 लशी उपलब्ध झाल्या आहेत.त्यातील आज पहिल्या दिवशी एकूण 100 जणांना लस देण्यात आली आहे.480 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे यावेळी आरोग्य कर्मचारी ,वैद्यकीय अधिकारी यांनी उत्साहाने लस घेतली यावेळी ज्यांनी लस घेतली आहे त्यांना 28 दिवसांनी पुन्हा लस दिली जाणार आहे  

       



               यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, गटविकास अधिकारी सौ.सुप्रिया चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्माकर आहिरे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ.सुमित्रा तांबारे, समन्वयक शोभा माने  डॉ ऋचा वैद्य डॉ धनंजय सरवदे, डॉ वर्षा  पवार डॉ प्रविण माने डॉ निखिल जोशी डॉ श्रीपाद माने डॉभीमराव पडवळे डॉ दत्तात्रय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

           ग्रामीण रूगणालयात  पाेलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते लस केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

Pages