मंगळवेढ्यात 4 हजार 600 ब्रास जप्त वाळू साठ्याचा लिलाव.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, January 12, 2021

मंगळवेढ्यात 4 हजार 600 ब्रास जप्त वाळू साठ्याचा लिलाव....


दिव्य न्यूज नेटवर्क

                जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

          मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सन 2018-19 मध्ये संयुक्त वाळू ठेक्याच्या  लिलावामधील शिल्लक असलेल्या  सुमारे  4 हजार 644.84 ब्रास वाळू साठा जप्त केला असून, हा वाळू साठा मौजे सिध्दापूर ता.मंगळवेढा येथे ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे  एक कोटी 71 लाख 85 हजार 908 रुपये इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार  दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांच्याकडे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी भोसले यांनी सांगितले.

                 सदर लिलावात भाग घेण्यासाठी  25 टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे  भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये 2 हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची 25 टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात 7 दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री.भोसले यांनी केले आहे.

Pages