मंगळवेढा येथे 22 ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79.59 टक्के मतदान;बालाजीनगर व नंदेश्वर येथे शांततेला गालबाेट. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 16, 2021

मंगळवेढा येथे 22 ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79.59 टक्के मतदान;बालाजीनगर व नंदेश्वर येथे शांततेला गालबाेट.

 

जिल्हाधिकारी यांची मरवडे,हूलजंती मतदान केंद्राला भेट....!


दिव्य न्यूज नेटवर्क

            मंगळवेढा तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी  182जगांसाठी  चुरशीने झालेल्या दि 15 रोजी     79.59 इतके टक्के मतदान झाले.दरम्यान बालाजीनगर येथे कर्तव्यावर आसलेल्या हाेमगार्डला शिवीगाळी दमदाटी उमेद्वाराच्या नातेवाईकाने केली तर नंदेश्वर येथे निवडणूक कारणावरून दाेघावर चाकू हल्याचा प्रकार घडल्याने निवडणूकीला गालबाेट लागले आहे.जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी मरवडे,हूलजंती मतदान केंद्राला तसेच जंगलगी येथे मृत पावलेल्या कुकूट पालन केंद्राला भेट दिली.

              तालुक्यातील22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पुरुष मतदार 26682 व महिला मतदार23678 असे एकूण50360 मतदार मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी40330 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  मतदानासाठी  94 बूथ उभारण्यात आले होते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यात  मोठ्या चुरशीने मतदान झाले आहे सकाळी साडेसात वाजता सर्वच गटांनी मतपेटीचे पूजन करून मतदानाला सुरवात केली प्रत्येक गावात आपल्यालाच मतदान व्हावे यासाठी उमेदवार व पार्टीप्रमुखानी वाहनांची सोय करीत वृद्ध पुरुष, महिला यासह इतर मतदारांना  येण्याआणण्याची व्यवस्था केली होती .वयस्कर असलेल्या परन्तु हक्काच्या व्यक्तींना देखील उचलून आणून मतदान करून घेत आसल्याचे चित्र हाेते.महमदाबाद शे येथे सर्वात जास्त म्हणजे 93.73 टक्के इतके मतदान झाले असून कमी मतदान भोसे येथे 60.39 टक्के इतके झाले आहे .                मतदानाची गावनिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे :- मरवडे- 81.11   बालाजीनगर-78.18     तांडोर-88.52    सिध्दापूर- 85.94 कात्राळ-कर्जाळ-74.17 आसबेवाडी-92.24 बोराळे-81.99 गणेशवाडी- 75.60 डोणज- 83.32 हुलजंती-79.75 महमदाबादशे-93.73 मल्लेवाडी-85.82 नंदेश्‍वर-82.23 लेंडवे चिंचाळे-83.79 लवंगी-75.06 अरळी-84.66 सलगर बु-77.48 माचणूर-83.90 तामदर्डी-76.92 घरनिकी-85.22 भोसे-60.39 कचरेवाडी-78.11 दरम्यान मरवडे येथील एका बुथमधील मशीन  मतदान चालू होन्यापूर्वीच बंद पडली होती परंतू तातडीने पर्यायी व्यवस्था करून मतदान वेळेत सुरू केले  .आज झालेल्या निवडणुकीत  जि प सदस्य नितीन नकाते यांचे बोराळे गाव ,जी प उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचे सलगर बु, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, उपसभापती सुरेश ढोणे, यांनी भोसे,प स सदस्य रमेश भांजे यांच्या अरळी गावात तसेच राजकीय चर्चेत असलेल्या नंदेश्वर गावात होणाऱ्या लढती पाहण्याजोग्या  झाल्या असून इतर गावात देखील सत्ताधारी व विरोधक यांनी तालुका पातळीवरील गट न पाहता स्थानिक पातळीवर आघाड्यां करून निवडणूक लढवल्या आहेत .182 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून दि 18 रोजी मतमोजणी होणार आहे आज झालेल्या निवडणुकीच्या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Pages