मंगळवेढा ब्रेकिंग:-अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, January 1, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग:-अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून....


दिव्य न्यूज नेटवर्क


            हिवरगाव येथे 28 वर्षीय विवाहित महिलेवर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने  धारदार शस्त्राने डोकीत वार करून पत्नीचा खून केल्याची घटना दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 वा. घडली असून याप्रकरणी मयताचा पती हणमंत मच्छिंद्र माने याला पोलिसांनी अटक केली आहे.

         

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील मयत रुपाली हणमंत माने हिचे नंदेश्वर येथील अज्ञात इसमाबरोबर अनैतिक  संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी तथा पती हणमंत माने याने दि.31 रोजी सकाळी 8.00 च्या दरम्यान शिवीगाळ,दमदाटी करून धारधार हत्याराने तीचे डोकीत वार करून तीचा खून केला आहे. याची फिर्याद मयत महिलेचा भाऊ बंडोपंत कोडग याने पोलिसात दिल्यानंतर आरोपीविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                  

               मंगळवेढयाचे डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी आरोपीस दोन तासात अटक करून जेरबंद केले आहे. दरम्यान,सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी खूनाची घटना घडल्याने  पोलिस यंत्रणेवर दिवसभर ताण दिसून येत होता.

Pages