खुपसंगीच्या नागरिकांकडून 'सिंदीवाल्याचा' अड्डा उध्वस्थ;रसायनयुक्त सिंदी विक्रेते जोमात पोलीस व उत्पादन शुल्क वाले कोमात.. - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, December 29, 2020

खुपसंगीच्या नागरिकांकडून 'सिंदीवाल्याचा' अड्डा उध्वस्थ;रसायनयुक्त सिंदी विक्रेते जोमात पोलीस व उत्पादन शुल्क वाले कोमात..



 खुपसंगी येथील युवकांकडून रासायनिक सिंदीवाल्याचा अड्डा उध्वस्थ.


दिव्य न्यूज नेटवर्क 

              मंगळवेढा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या अर्थपूर्ण आशिर्वादामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक सिंदी  विक्रीचा जोर वाढल्याने अनेक युवक नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत त्यातच दि 28 रोजी खुपसंगी येथील एका युवकाला रासायनिक सिंदी मुळे अतिशय त्रास होऊ लागल्यामुळे येथील ग्रामस्थांनी पटेल वस्तीनजीक असणाऱ्या रासायनिक शिंदेची विक्री करणाऱ्या चिवडाप्पा नामक  विक्रेत्या च्या अड्यावर छापा टाकून सुमारे 200 लिटर सिंदी व रासायनिक पावडर उद्धवस्त करीत  त्या विक्रेत्याला चांगलाच दम भरला परत सिंदी विकणार नाही असे सांगितल्याने त्यास सोडण्यात आले  दरम्यान तालुक्यात उघडपणे सुरू आसलेल्या रासायनिक सिंदी विक्री कडे दोन्ही खात्याचे अधिकारी कारवाईबाबत मूग गिळून गप्प आहेत.

         

याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा शहर,शेलेवाडी ,अकोला ,गणेश वाडी, खुपसंगी,खडकी,पाटकळ,नंदुर,निंबोणी,भोसे, हुन्नुर,आदी दहा ते अकरा गावांमध्ये परराज्यातून आलेल्या काही विक्रेत्यांनी गावातील स्थानिक  भ्रष्ट लोकांना हाताशी धरून रासायनिक सिंदी विक्रीचे पाय रोवले आहेत या शिंदी विक्रेत्यांनी बेकायदेशीररीत्या व रासायनिक सिंदी विक्रीचा व्यवसाय मोठया प्रमाणात चालवून येथेच स्थायिक होत अनेक गावांमधून सुमारे दहा ते वीस एकर जमिनीचे मालक  होत स्थिरस्थावर झाले आहेत तसेच  सुरवातीला एकट्याने येऊन स्थिरस्थावर होत काही कालावधी नंतर गावाकडील संपूर्ण कुटुंब येथेच स्थायिक करीत  रासायनिक शिंदी विक्रीचा व्याप वाढवला आहे.

           अकोला, गणेशवाडी खुपसंगी,पाटखळ.खडकी येथील काही शिंदे विक्रेते  नव्याने सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील गणेशवाडी जवळील पुलावर खुलेआम विक्री करीत आहेत यातील काही जण येथे शिंदी बनवून पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या मोठ्या शहरात जाऊन खुलेआम विक्री करीत आहेत या गावांमधील ओढ्यांना गेली कित्येक वर्षे पाणी नव्हते त्यामुळे या सिंदीच्या झाडांमधून शुद्ध शिंदी, निरा निघत नसताना ही रासायनिक पावडर वापरून सिंदी बनवुन त्याची विक्री स्वस्तात करीत अनेक युवकांना व्यसनाधीन केले आहे.

     

या रासायनिक सिंदीमुळे अनेकांचा जीव गेला आहे  सध्या दारू पेक्षा सिंदी अतिशय स्वस्त   असल्याने नशा करण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो ग्रामीण भागातील युवकाबरोबर शहरी भागातील युवक देखील या ठिकाणी हजेरी लावत आहेत  रासायनिक शिंदे विक्रीची  येथील स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना माहिती असून देखील मंथली घेत असल्याने कोणतीही कारवाई  केली जात नाही  गेल्या चार दिवसांपूर्वी खुपसंगी येथील एक युवकाने  पाटखळ खुपसंगी हद्दीवर असणाऱ्या सिंदी  विक्रेत्याकडे  सिंदी प्याल्यानंतर तो जागेवरच चक्कर येऊन डोळे पांढरे करून शुद्ध हरपली होती त्यामुळे त्या युवकाच्या कुटुंबाने त्याच्यावर उपचारसाठी बराच खर्च केला तरीही त्या युवकाची तब्बेत चांगली झाली नाही या अगोदर देखील चिवडाप्पा नामक त्या सिंदी विक्रेत्यास सिंदी विकू नको असे सांगून सुद्धा त्याने न ऐकल्याने  संतप्त झालेल्या येथील समीर पटेल दिनेश लेंगरे अण्णा वाले,गजेंद्र नलवडे,बाळू पटेल, यांच्यासह 15 ते 20 युवकांनी दि 28 रोजी साडेचार च्या दरम्यान त्याच्या आड्यावर जाऊन तेथे बनवलेली सुमारे दोनशे लिटर रासायनिक शिंदी नष्ट करीत साहित्य उध्वस्त केले व पुन्हा विक्री केल्यास तुझी गय केली जाणार नाही असा दम दिला.

        हा चिवडापा नामक परप्रांतीय सिंदी  विक्रेता गेल्या दहा वर्षापासून येथे अवैधरित्या रासायनिक सिंदीची विक्री करत अनेकांना व्यसनाच्या आहारी लावून पोलिसांना हाताशी धरत आपले उखळ पांढरे करून घेत आहे तशीच परिस्थिती तालुक्यात असून तालुक्‍यात सुमारे हजारो लिटर विक्री होत असताना उत्पादन शुल्क विभाग व पोलीस खाते बघ्याची भूमिका घेत असून अनेकांचे संसार उघड्यावर आणत आहे याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन या रसानिक सिंदी  विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे अन्यथा नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Pages