नंदेश्वरच्या निवडणुकीत 'ढाण्या वाघाच्या' डरकाळीने विरोधकांच्या उरात भरु लागली या धडकी ? - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, December 24, 2020

नंदेश्वरच्या निवडणुकीत 'ढाण्या वाघाच्या' डरकाळीने विरोधकांच्या उरात भरु लागली या धडकी ?


दिव्य न्यूज नेटवर्क..

                मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून यासाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. यामध्ये मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांना दक्षिण भागाचा ढाण्या वाघ म्हणून संबोधले जाते.व त्यांची मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख आहे; कारण त्यांचे वेगळेपण म्हणजे एक सर्वसामान्य अंगठाबहाद्दर माणुस ते अगदी पंचायत समिती उपसभापतीपर्यंतचा त्यांचा हा थक्क करणारा प्रवास अगदी सुशिक्षित माणसाच्याही डोळ्यात अंजन घालण्यासारखा आहे.

             

मात्र पाठीमागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दादासाहेब गरंडे यांच्यापुढे सर्वांनी एकत्रित येऊन दंड थोपटले त्यामुळे दादासाहेब गरंडे यांना हार मानावी लागली; मात्र आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ढाण्या वाघाने 'एकला चलो रे' ची भूमिका घेत 'हम भी किसीसे कम नही' असा इशारा देऊन पुन्हा एकदा रात्रीच्या अंधारात गनिमीकाव्याने घोंगडी बैठकीच्या आयोजनाला व नियोजनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवुन लोकांच्या हृदयात पुन्हा एकदा स्थान निर्माण केलेले आहे.

           

पाठीमागील पाच वर्षात दादासाहेब गरंडे यांनी आपलेपणाने मतदार बंधू भगिनींची चौकशी करून अनेकजणांच्या विविध अडचणीसाठी त्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले आहे त्याच बरोबर स्वतः अडचणीत असतानाही दुसऱ्यांना मदत करणे हा त्यांचा मूळ स्वभाव लोकांना आपलासा वाटल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी व मतदारांनी जाहीरपणे त्यांच्यासोबत त्यांच्या हातात हात देऊन आपण दादासाहेब गरंडे यांच्यासोबत असल्याची पूर्ण खात्री दिली आहे व या त्यांच्या हाकेला नंदेश्वर येथील युवकांकडूनही पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सद्यस्थितीला पहावयास मिळत आहे.

               एकंदरीत सर्वच बाजूने पाहता दादासाहेब गरंडे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यामुळे तसेच परगावी असलेल्या नोकरदार वर्गाकडूनही दादासाहेब गरंडे यांना काही मदत लागली तर आम्हीही मदत करु असे आश्वासन मिळत असल्यामुळे दादासाहेब गरंडे यांना एकंदरीत या सर्व गोष्टींचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्यामुळे व त्यांच्या आजपर्यंतच्या राजकारणातल्या पस्तीस ते चाळीस वर्षाच्या रांगडा अनुभवांमुळे त्यांनी जोर लावलेल्या घोंगडी बैठकीच्या नियोजनाला लोकांचा प्रतिसाद जास्तीत जास्त मिळत असल्यामुळे खऱ्या अर्थाने  ढाण्या वाघाच्या नियोजनांमुळे विरोधकांच्या उरात होऊ लागले धडधड असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Pages