मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील माचनूर येथील पुलाची अंत्यत दुरवस्था संरक्षक पाईप नसल्याने वाहतूक बनली धोकादायक ... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, December 24, 2020

मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील माचनूर येथील पुलाची अंत्यत दुरवस्था संरक्षक पाईप नसल्याने वाहतूक बनली धोकादायक ...

 


मंगळवेढा/प्रतिनिधी

               सोलापूर --मंगळवेढा महामार्गावरील सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या माचनूर येथील पुलाची अंत्यत दुरवस्था झाली आहे पुलावरील रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून पुलाच्या संरक्षक पाईप तुटून पडल्या आहेत या महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून तात्काळ महामार्गावरील पुलाची दुरुस्ती करावी अन्यथा या पुलावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा ब्रह्मपुरी येथील विकास सोसायटीचे चेअरमन राजन पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

             

रत्नागिरी-नागपूर या महामार्गावर माचनूर- बेगमपूर येथील पुलाची भीमेला आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले होते. पुलावरील संरक्षक पाईप पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. महापुरातील पाण्याच्या मोठ्या दाबाने पुलाची मोठी हानी झाली होती चार दिवस पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.पुलावरील पाणी ओसरताच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरू केली मात्र त्या नंतर संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांनी या पुलाची कायमस्वरूपीची कोणतीही दुरुस्ती केली नाही याबाबत नागरिकांनी वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे मात्र पुलाची दुरावस्था पाहून नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. 

       

या पुलाला पुरेसे संरक्षक पाईप नसल्याने वाहनचालकाना मोठा धोका निर्माण झाला आहे रात्री मोठ्या वाहनांच्या प्रखर लाईट मुळे छोटया वाहनचालकाना रस्ता दिसून येत नसून थेट नदीत कोसळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे यावरून कोणाचा जीव गेल्यावर या पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे का असा संतापजनक सवाल वाहन चालकातून विचारला जात आहे.या दुरवस्था झालेल्या पुलाची आठ दिवसांत दुरुस्ती करावी अन्यथा हा महामार्गवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा  महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे

Pages