केंद्रीय पथकाने 'अंधार्‍या रात्री' मोबाईलच्या प्रकाशात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, December 23, 2020

केंद्रीय पथकाने 'अंधार्‍या रात्री' मोबाईलच्या प्रकाशात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी...

 

दिव्य न्यूज नेटवर्क 

                मंगळवेढा तालुक्यातील सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी दोन सदस्यीय केंद्रीय पथकाणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कचरेवाडी येथील बाजरी व सूर्यफूल पिकाची पाहणी केली  ही पाहणी संध्याकाळी 7 वा विजेचा प्रकाश पाडून करण्यात आली यावेळी त्यांनी नेमके काय पाहिले  असा सवाल शेतकरी वर्गातून होत असून पाहणी दौरा हा केवळ फार्स तर नाही ना  असे उपस्थितांमधून बोलले जात होते.

                 

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पावसाने तालुक्यातील नदीकाठ व इतर भागातील मोठे नुकसान झाले होते या  नुकसानीचे  पंचनामे करीत महसूल विभागाने सुमारे 41 कोटींचे नुकसान झाल्याचे सरकारला कळविले होते परंतु सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता सरकारने केवळ 21 कोटींची नुकसान भरपाई तालुक्यातील शेतकऱ्यांना पाठवली परंतु ती देखील अद्याप मिळाली नाही राज्य सरकारने  केंद्राकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकली व केंद्राकडे निधीची मागणी केली त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर केंद्रांच्या पथकाला जाग आली आहे ते पथक दि 22 रोजी  मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले परंतु या पथकाने केवळ रस्त्याच्या कडेला असणारे सोईस्कर एक दोन ठिकाणची पाहणी केली  येथील कचरेवाडी येथील रुक्मिणी चोरमले यांच्या बाजरी पिकाची तर गणपत आवताडे यांच्या सूर्यफूल पिकाची पाच मिनिटात पाहनी केली विशेष म्हणजे हे पथक सांयकाळी 7 वा शेतात आले यावेळी नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल विभागाने मोबाईल उजेड केला होता.

     

तसेच यावेळी मोबाईलच्या उजेडाचा पथकाने आधार घेत पीक नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानी बाबत विचारले  यावेळी शेतकऱ्यांनी अतोनात नुकसान झाल्याचे सांगत राज्यशासनाची मदत तोकडी असून केंद्राने मोठी मदत द्यावी अशी मागणी केली  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा कृषिअधिकारी रवींद्र माने, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, उपअभियंता सिद्धेश्वर काळुंगे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Pages