स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याना तलवारी दाखवून आंदोलनावर दबाव आणण्याचा प्रयत्न,अज्ञात दोघांविरूध्द गुन्हा दाखल..... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, December 20, 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याना तलवारी दाखवून आंदोलनावर दबाव आणण्याचा प्रयत्न,अज्ञात दोघांविरूध्द गुन्हा दाखल.....

 


मंगळवेढा/प्रतिनिधी 

                 श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एफ.आर.पी. व 14 टक्के वाढ प्रमाणे ऊसाचे बिल मिळावे या मागणीसाठी  गेली दोन दिवस धरणे आंदोलन सुरु असून दि. 18 रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान मोटर सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी हातात नंग्या तलवारी घेवून धमकावून आंदोलनकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी  अज्ञात दोन इसमाविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

                       

 पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर मागील दोन दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड.राहुल घुले,तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, दत्तात्रय गणपाटील,युवा आघाडी तालुकाध्यक्ष रोहित भोसले,शंकर संगशेट्टी,राजेंद्र रणे,विजय तळ्ळे,विजय पाटील,संदिप तळ्ळे,अनिल अंजुटगी,शिवाजी हेरकर,सुधाकर मेटकरी,चंद्रकांत पाटील आदी कार्यकर्ते दि. 16 पासून एफ.आर.पी.2119 व 14 टक्के वाढ ऊस बिल मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कारखाना स्थळावर  धरणे आंदोलन करीत आहेत.

                दि.18 च्या रात्री 10.30 वा. कारखान्याच्या मेन गेटसमोर कार्यकर्ते आंदोलन करीत बसले असता एक लाल कलरच्या डिस्कव्हर मोटर सायकलवरून दोन अज्ञात इसम हातात नंग्या तलवारी घेवून तलवार आंदोलनकर्त्याकडे दाखवून गर्भित इशारा देत तेथून कारखाना चौकाकडे निघून गेल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय लक्ष्मण गणपाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस नाईक कोळी हे करीत आहेत.

                  दरम्यान या घटनेचा निषेध व्यक्त करीत  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,सचिन पाटील,अ‍ॅड. राहुल घुले,शांताप्पा कुंभार,गजेंद्र पुजारी,दत्तात्रय गडदे,विजय रणदिवे,रणजित बागल,हर्षद डोरले यांचेसह अन्य कार्यकर्त्यानी ऊसाच्या गव्हाणीत दुपारी 12.00 वा. उडया टाकून गव्हाण बंद पाडली.या घटनेमुळे दुपारपासून कारखान्याचे गाळप होवू शकले नाही.दामाजी कारखान्यावर आंदाेलन कर्तावर तलवारी दाखवुन दबाव आनल्याच्या निषेदार्थ कार्यकर्तांनी गव्हाणीत उड्याटाकुन गाळप बंद पाडले

Pages