खडकी येथे विद्युत मोटारीच्या चोरी प्रकरणी तीघांविरूध्द गुन्हा दाखल.. - Divyaprabhat News

Breaking News

Monday, December 14, 2020

खडकी येथे विद्युत मोटारीच्या चोरी प्रकरणी तीघांविरूध्द गुन्हा दाखल..


मंगळवेढा/प्रतिनिधी

          खडकी येथील हबीब शेख यांच्या विहिरीवरील 14 हजार रुपये किमतीची पाणबुडी मोटार चोरून नेल्याप्रकरणी रविंद्र शिंदे मेटकरवाडी,नितीन वाघमोडे हिवरगांव,सौरभ साबळे खडकी या तीघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

         

  पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी हबीब शेख यांच्या खडकी येथील शेतातील विहिरीत 5 एच पी ची 14 हजार रुपये किमतीच्या लाडा,लक्ष्मी कंपनीच्या तीन विद्युत मोटारी दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 च्या पुर्वी वरील तीघांनी चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस हवालदार दयानंद हेंबाडे हे करीत आहेत.दरम्यान, शेतातील बोअरवरील मोटारी,केबल,स्टार्टर,अ‍ॅटो स्वीच आदी साहित्य चोरण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून शेतकरी पोलिसात चोरीची फिर्याद दाखल करतात मात्र पोलिसांना आत्तापर्यंत एकही चोरटा जेरबंद करण्यात यश आले नसल्याने चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण पसरले आहे. घरफोडयाबरोबर आता चोरटयांनी आपला मोर्चा शेतातील कृषी पंपाकडे वळविल्याने शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.

Pages