मंगळवेढयातील 79 ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत 16 डिसेंबर रोजी.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, December 11, 2020

मंगळवेढयातील 79 ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत 16 डिसेंबर रोजी....

 दिव्य न्यूज नेटवर्क 

              मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत दि. 16 रोजी सकाळी  11.00 वा.तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.

               मंगळवेढा तालुक्यातील  79 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण निहाय जागा पुढीलप्रमाणे अनु.जाती- 10 जागा पैकी 5 जागा महिलांसाठी आरक्षीत,नागरिकांचा मागास प्रवर्ग-21 जागापैकी 11 जागा महिलांसाठी आरक्षीत, अनु. जमाती 0 जागा,सर्व साधारण जनरल 48 जागासाठी  24 जागा महिलांसाठी एकूण 79 जागा आहेत. या सरपंच आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य,पंचायत समिती सभापती,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.                 

माचणूर,रहाटेवाडी,तामदर्डी,ब्रम्हपुरी,बठाण,उचेठाण,पाटखळ,गणेशवाडी,मेटकरवाडी,डोणज, भालेवाडी, डोंगरगांव, कचरेवाडी,मरवडे,तळसंगी, खोमनाळ, फटेवाडी, भाळवणी, हिवरगांव ,येड्राव, जित्ती, खवे ,डिकसळ, निंबोणी,चिकलगी,नंदेश्‍वर, जुनोनी,गोणेवाडी,खुपसंगी, लेंडवे चिंचाळे ,शिरसी, हाजापूर, जालिहाळ, खडकी,आंधळगांव, मारापूर,शेलेवाडी,घरनिकी,अकोले,लक्ष्मी दहिवडी,गुंजेगांव,महमदाबाद शेटफळ, ढवळस, मल्लेवाडी,देगांव,मुढवी,हुलजंती,माळेवाडी,सोड्डी,शिवणगी,येळगी,सलगर बु,सलगर खु, आसबेवाडी, बावची,पौट, जंगलगी, लवंगी,भोसे ,शिरनांदगी ,हुन्नूर, मानेवाडी,रेवेवाडी,रड्डे,सिध्दनकेरी ,लोणार,पडोळकणवाडी,महमदाबाद,हुन्नूर,मारोळी,बोराळे ,मुंढेवाडी,सिध्दापूर,अरळी,कागस्ट,कात्राळ-कर्जाळ,बालाजीनगर,नंदूर.आदी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ही आरक्षण सोडत आहे.

              सोलापूर जिल्हयात 11 तालुक्यातील 1028  ग्रामपंचायत सरपंच पदाच्या जागेसाठी  आरक्षण सोडत होत आहे.दरम्यान,यामध्ये 50 टक्के महिलांसाठी जागा राखीव असल्याने महिलांना गावपातळीवरील कारभार करण्याची संधी मिळणार आहे.

Pages