पाठखळ आंधळगाव रस्त्यावरील प्रवास ठरतोय जीवघेणा!संबंधित विभागाचे मात्र सोईस्कर दुर्लक्ष.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, December 15, 2020

पाठखळ आंधळगाव रस्त्यावरील प्रवास ठरतोय जीवघेणा!संबंधित विभागाचे मात्र सोईस्कर दुर्लक्ष....


 दिव्य न्यूज नेटवर्क

               मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ आंधळगाव या रस्त्यावरील पाटखळ नजीक असणाऱ्या ओढ्यावरील रस्त्या मोठ्या प्रमाणात खचला आहे त्यामुळे या ठिकाणी रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले असून येथील प्रवास जीवघेणा ठरत असल्याने येथील रस्त्याची उंची वाढवून येथील ओढ्यावर पूल बांधण्याची मागणी होत आहे. 

             

पाठखळ ते आंधळगाव हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून उखडलेला आहे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून नागरिकांना प्रवास करणे मुश्किल झाले आहे तसेच पाठखळ गावजवळून ओढा वहात असून या ओढ्याला गेल्या अडीच महिन्यापासून मोठ्या प्रमाणत पाणी वाहत आहे हे पाणी आंधळगाव पाठखळ या रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाहत आहे तसेच या ओढ्यावर असलेला रस्ता पाणी वाहून जाणाऱ्या पाईप फुटल्यामुळे खचला आहे त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असून प्रवाशांना वाहतूक करणे अवघड झाले आहे तसेच पाण्याच्या वेगामुळे येथील रत्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून पाण्यातून वाहन जाताना ते दिसत नाहीत त्यामुळे दुचाकी वाहने पाण्यात पडत असून दुचाकीस्वाराचे अपघात होत आहे.

           

 तसेच गाड्यांचे देखील पाण्यात भिजवून नुकसान होत आहे  या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्याचे  हाल होत असताना संबंधित विभाग मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे गेल्या वर्षभरापासून येथिल ओढ्यावरील रस्त्याच्या पाईप फुटूलेल्या असताना ही दुरुस्तीसाठी काहीच उपाय योजना होत नाहीत सध्या येथील ओढ्यावरील रस्त्यावरून जाणे धोकादायक झाले असून प्रवाशासाठी जीवघेणा प्रवास ठरत असल्याने या ओढ्यावरील रस्त्याची दुरुस्ती करून उंची वाढवावी तसेच येथून वाहनांची वर्दळ मोठी असल्या ने पूल बांधण्याची मागणी होत आहे.


Pages