युटोपियन शुगर्स ची ऊस उत्पादकांना २०० रु.ची दिवाळी भेट;कामगारांनाही १६.६६% बोनस :- उमेश परिचारक - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, November 10, 2020

युटोपियन शुगर्स ची ऊस उत्पादकांना २०० रु.ची दिवाळी भेट;कामगारांनाही १६.६६% बोनस :- उमेश परिचारक

 

दिव्य न्युज नेटवर्क 

         युटोपियन शुगर्स  लि. पंतनगर कचरेवाडी या कारखान्याने या पूर्वीच ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देण्याचे जाहीर केल्याप्रमाणे  गळीत हंगाम २०१९-२० या कालावधीत गाळप केलेल्या ऊसास प्रति मे. टन २०० रु. प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याची व कामगारांचीही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांनाही १६.६६% बोनस म्हणून दिला असल्याची माहिती  कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. 

     

 यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले कि,युटोपियन शुगर्स ने गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ४,०३,२३२ मे. टन इतक्या ऊसाचे गाळप करीत ९.९१% इतक्या सरासरी रिकव्हरी ने ३,९९,५००क्विं.इतकी साखर उत्पादित केली आहे. चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे पुरेशा प्रमाणावर ऊस आहे. मात्र कारखाना प्रशासनावर विश्वास टाकून ज्या  ऊस उत्पादकांनी २०१९-२० या गळीत हंगामामध्ये युटोपियन शुगर्स ला ऊस दिला आहे त्या सर्व ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले होते,त्यास अनुसरून शब्द्पूर्ती करीत ऊस उत्पादकांना प्रति मे.टन २०० प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे.

   

दिवाळीच्या तोंडावरती सदर ची रक्कम मिळत असल्याने ऊस उत्पादकांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीची साखर हि घरपोच देण्यात येणार  असल्याचे सांगून शेती विभागा मार्फत सदर च्या साखरेचे वाटप चालू करण्यात आले आहे.कारखान्याच्या उभारणी मध्ये कामगारांचे ही योगदान तितकेच महत्वाचे आहे कामगारांची जिद्द,चिकाटी,व सकारात्मक दृष्टीकोण या बाबी कारखान्याच्या प्रगती मध्ये हातभार लावणार्‍या असतात. त्यामुळे त्यांची ही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांना ही १६.६६% प्रमाणे बोनस देण्यात आला असल्याची माहिती ही चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.तसेच त्यांनी ऊस उत्पादक,कर्मचारी, व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

        या प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Pages