मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई;विना मास्क फिरणार्‍या नागरिकांकडून 7 लाख 88 हजारांचा दंड वसूल.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, November 11, 2020

मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई;विना मास्क फिरणार्‍या नागरिकांकडून 7 लाख 88 हजारांचा दंड वसूल....

 

दिव्य न्यूज नेटवर्क

                 मंगळवेढा शहरात विना मास्क फिरणार्‍या 6400 लोकांवर दंडात्मक कारवाई करून 7 लाख 88 हजार इतका दंड पोलिस प्रशासनाने वसूल केला आहे.दरम्यान,सध्या थंडीचे दिवस असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहित धरून प्रत्येकाने मास्क लावूनच घराबाहेर पडावे असे आवाहनही जनतेला करण्यात आले आहे.

             

कोरोना या संसर्गजन्य साथीने सर्वत्र थैमान घातले असून याचा फटकाही मंगळवेढा तालुक्याला बसला आहे. मंगळवेढा तालुक्यात आत्तापर्यंत कोरोना बाधितांची संख्या जवळपास दीड हजारापर्यंत पोहोचली असून यामध्ये मृत्यूचे प्रमाण 42 वर गेले आहे.सध्या हिवाळा ऋतू चालू असल्याने  थंडीचे प्रमाण वाढते आहे. या हवामानात  कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे हिताचे आहे.जिल्हाधिकारी यांनी मास्क लावणेबाबत आदेश काढूनही  त्याचे प्रत्येकाकडून पालन होत नसल्याचे दिसून येत असल्याने पोलिस प्रशासनाला दंडात्मक कारवाई करून मास्क लावणे नागरिकांना भाग पाडावे लागत आहे.

                पोलिस प्रशासनाने  दि. 6 जुलै ते 9 नोव्हेंबर दरम्यान 6400 नागरिकांवर विना मास्कची कारवाई करून 7 लाख 88 हजार 150 रूपये इतका दंड वसूल केला आहे.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे पोलिस नाईक वाघमोडे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी केली आहे.

    

Pages