नाना तुम्ही लवकर बरे व्हा ! आ.भालके समर्थकांची प्रार्थना..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, November 2, 2020

नाना तुम्ही लवकर बरे व्हा ! आ.भालके समर्थकांची प्रार्थना.....


दिव्य न्युज नेटवर्क 

                पंढरपूर-मंगळवेढयाचे विधानसभा आमदार भारत (नाना)भालके साहेबांना काही दिवसा पूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी मंगळवेढा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी आ.भारत भालके साहेबाच्या  तब्येतीत सुधारणा होऊन लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मंदीरात प्रार्थना केली जात आहे.

               

आ.भालके साहेबांच्या  तब्येतीत सुधारणा होण्यासाठी आमदार समर्थकांनी मंगळवेढा शहरातील गैबीसाहेब दर्गा येथे ,माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर येथे, हुलजंती येथील महालिंगराया मंदिर येथे ,मारोळी येथे श्री.संत बागडे बाबा मंदीर येथे , सिद्धापूर येथील गणपती मंदिर येथे ,नंदेश्वर येथील बाळकृष्ण महाराज मंदिर  येथे , पाटखळ येथील हनुमान मंदिर येथे ,  लक्ष्मीदहिवडी येथील लक्ष्मीदेवीच्या मंदिरात ,खुपसंगी येथील दर्ग्यात,हुन्नुर येथील बिरोबा मंदिरात, असलेल्या दैवतांना आमदार समर्थकांनी दुधाचा अभिषेक घातला व निरोगी आयुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करून आमदार भालके यांची  लवकरात लवकर कोरोनातून मुक्तता करावी अशी देवता कडे प्रार्थना केली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणची मंदिरे बंद असल्या कारणाने मंदिरा बाहेरच ग्रामदैवताकडे प्रार्थना केली.

                  आ.भालके साहेबांच्या वरती रुबी हॉल (हॉस्पीटल) पुणे येथे उपचार चालू असून सध्या प्रकृती उत्तम आहे

   

 मारोळीत बसवराज पाटील, नागराज जमखंडी, शिवकुमार पाटील, ब्रह्मदेव हाके, प्रकाश पाटील,महादेव लोखंडे,नंदेश्वर येथे भिवाजी दोलतडे ज्ञानेश्वर मेटकरी गुरुजी गेना दोलतोडे ,बापू मेटकरी अशोक दोलतडे,लक्ष्मी दहिवडीत  डाॅ.प्रशांत पाटील,अनिल आदलिंगे, महेश स्वामी, शेळके गुरूजी,   सिद्धापूरात दयानंद सोनगे, संतोष सोनगे,  किसन भजनावळे, माचणूर येथे सुनील डोके सर भारत बेदरे महादेव फराटे धनंजय गायकवाड हुलजंतीत उमाकांत कनशेट्टी मधुकर गंगमई मारुती पेट्रर्गी,खुपसंगीत शहाजान पटेल कुशाबा पडवळे सिध्देश्वर रूपनर पाठखळ येथे हर्षराज बिले,भारत भोसले ,महादेव डांगे,तुकाराम गोडसे, भिवा पवार,बाबुराव जाधव, विशंभर पवार हनुमंत गडदे,जगदिश गुरव,भारत खुळे, शत्रु शिंदे यांच्यासह अनेक गावातील समर्थक उपस्थित होते. तसेच आ.भारत (नाना) भालके साहेब व विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ (दादा)भालके कोरोना मुक्त व्हावेत म्हणून बिरोबा मंदिरात अभिषेक करण्यात आले प्रसंगी चेअरमन बसवराज पाटील, माजी सभापती तानाजी काकडे, माजी सरपंच जगन्नाथ रेवे, हुन्नरचे सरपंच मच्छिंद्र खताळ, बिरोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजाराम पुजारी, रेवेवाडीचे सरपंच  ब्रह्मदेव रेवे,शिरनांदगी सरपंच गुलाब थोरबोले, माजी सरपंच यशवंत होळकर, शिवाजी पुजारी, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आ.भालके साहेबांनी मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसनीचा पाहणी दौरा केला होता.गावो गावी जाऊन लोकांशी थेट संवाद साधला होता. त्याच बरोबर पुरामुळे व अन्य कारणांनी मयत  झालेल्या व्यक्तिच्या  कुटूंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले होते. संकटात सापडलेल्या जनतेसाठी आ.भालके यांनी पाहणी दौरा करून दुःख जाणून घेतले होते.

                           

  मंगळवेढा तालुक्यात आमदार भालके यांनी मोठ्या प्रमाणात विविध विकासाची कामे केली आहेत. स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता सतत लोकांमध्ये  जाऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आ.भारत भालके सातत्याने प्रयत्नशील असतात. विशेष करून ग्रामीण व शहरी भागातील जनतेशी आ.भालके यांचे जास्त जवळीक असल्याने आ.भालके यांना कोरोनाची लागण झाल्याचे लोकांना समजताच नाना तुम्ही लवकर बरे व्हा ! अशी प्रार्थना आ.भालके समर्थक करु लागले आहेत

Pages