बेकायदा वाळू साठा प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त हाेताच त्या पाेलीसावर कारवाई :-पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, October 29, 2020

बेकायदा वाळू साठा प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त हाेताच त्या पाेलीसावर कारवाई :-पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते...


दिव्य न्यूज नेटवर्क

            मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे कार्यरत असलेले तत्कालीन पोलिस नाईक गजानन पाटील यानी केलेल्या  अवैध वाळू साठा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांना आदेश दिले असून याचा अहवाल येताच संबंधितावर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवेढा भेटीप्रसंगी प्रसारमाध्यमांना दिली.

         

मूळचे लक्ष्मी दहिवडी येथील रहिवासी असलेले पोलिस नाईक गजानन पाटील हे मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी अवैध  वाळू घेवून जाणारी वाहने अडवून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षीत असताना वाळूचे टिपर स्वतःच्या घरबांधकामासाठी लक्ष्मी दहिवडी येथे नेवून वाळूसाठा केल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी करून तशी तक्रार तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे मागील दोन महिन्यापुर्वी केली होती. तहसीलदार यांनी संबंधित गावच्या तलाठयांना वाळूसाठयाचा पंचनामा करून अहवाल मागवून पोलिस नाईक पाटील यास जवळपास दीड लाखाचा दंड केला होता. तो न भरल्यामुळे सदर पोलिस नाईकाच्या 7/12 वर बोजा चढविण्याची कारवाई महसूल प्रशासनाने केली मात्र पोलिस प्रशासनाने त्यांचा कर्मचारी पोलिस नाईक पाटीलवर कारवाई करणे अपेक्षित असतानाही गेल्या दोन महिन्यापासून कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे खादी वर्दीवरील विश्‍वासाबाबत जनतेमधून शंका कुशंका निर्माण  होत होत्या.सर्वसामान्यावर तात्काळ पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जाते मात्र हा पोलिस खात्यातील कर्मचारी असल्यामुळे अधिकार्‍यांनीही कारवाई न करता त्यास पाठीशी घालण्याचे काम केल्याचा आरोप जनतेमधून होत होता.

            दरम्यान,नव्याने कार्यभार स्विकारलेल्या सोलापूर जिल्हयाच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्याला भेट दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिस नाईक पाटील यांनी केलेल्या बेकायदा वाळू साठा प्रकरणाची चौकशी मंगळवेढयाचे डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांच्याकडे दिली आहे.या चौकशीचा अहवाल आल्यानंतर तात्काळ संबंधितावर कारवाई केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

Pages