पुणे पदवीधरसाठी शिवसेनेकडून शैला गोडसे यांच्या नावाची शिफारस.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, November 5, 2020

पुणे पदवीधरसाठी शिवसेनेकडून शैला गोडसे यांच्या नावाची शिफारस..


पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी! जिल्ह्यातील पदाधिकारी भेट घेणार..


दिव्य न्युज नेटवर्क 

           पुणे विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. महाआघाडीकडून कोणती जागा कोणत्या पक्षाला हे निश्चित नसले तरी मागील पदवीधर निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवत जोरदार टक्कर देणाऱ्या झेडपी सदस्या व शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळावी, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांची भेट घेणार असून झेडपी सदस्या शैला गोडसे या गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेमध्ये जिल्हा महिला संघटक म्हणून प्रभावी म्हणून काम करीत आहेत.

         

 ग्रामपंचायत सरपंच ते झेडपी सदस्य, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून त्या सध्या काम करीत आहेत. सन २०१७ मध्ये विद्यार्थी सेना व इतर संघटनांच्या मदतीने सोलापूर विद्यापीठ पदवीधर निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करून त्यांनी इतर पक्षांसमोर आव्हान उभे केले होते. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी जोरदार तयारी केली होती.

         मात्र ती जागा मित्र पक्षाला गेल्याने त्यांना निवडणूक लढविता आली नाही. मात्र त्यादरम्यान मतदारसंघातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन शिवसेना घराघरात पाेहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे त्यांनी केले आहे सन २०१४ मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत कोणताही अनुभव नसताना भाजपा व आघाडीच्या तत्कालीन उमेदवारांना जोरदार टक्कर दिली होती. अपक्ष असूनही त्यांना पहिल्या व दुसऱ्या पसंती क्रमाची मते मोठ्या प्रमाणात मिळाली होती. यावर्षी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीतर्फे निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत थोडक्या मताने पराभूत झालेल्या शैला गोडसे यावर्षी ही जागा नक्कीच शिवसेनेला मिळवून देतील, म्हणून पक्षाने त्यांचा उमेदवार म्हणून गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती सोलापूर शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व पक्षाच्या इतर वरीष्ठ नेत्याकडे मागणी केली आहे.या निवेदनावर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे गणेश वानकर, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे,  आदींनी विनंती केली आहे.


           सन२०१४ मध्ये झालेली पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती त्यावेळी लक्षवेधी मते मिळविण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो होतो.आता मी शिवसेना पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करित असून सोलापूर जिल्ह्यातील चारही जिल्हाप्रमुखानी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून मला उमेदवारी मिळण्याबाबत पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब यांच्याकडे शिफारस केली आहे.शिवसेना पक्षातर्फे किवा महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढविण्याची संधी मिळेल असे मला वाटते.

सौ.शैला गोडसे जि.प.सदस्या.


Pages