जिल्ह्यातील भाजपाचे संघटन मजबुत करणार :- श्रीकांत देशमुख.. - Divyaprabhat News

Breaking News

Monday, August 10, 2020

जिल्ह्यातील भाजपाचे संघटन मजबुत करणार :- श्रीकांत देशमुख..


मोहोळ ता.प्रतिनिधी

          नुकतेच भाजपाच्या जिल्हाअध्यक्षपदी विराजमान झालेले भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवण्यास सुरवात केली आसुन संपुर्ण जिल्हाभर दौ-याचा सपाटा त्यांनी लावला आसल्याचे दिसत आहे.या दौ-यांतुन कार्यकर्त्यांच्या आडचणी जाणुन घेण्यास त्यांनी सुरवात केली आसुन याच पार्श्वभुमीवर बेगमपुर येथे त्यांनी धावती भेट दिली होती.यावेळी येथील युवा नेते पांडुरंग सरवळे,विनोद सोनवले,राजगोपाल खांडेकर,सद्दाम पटेल,किरण सरवळे,संतोष जाधव,विकास म्हञे,तनवीर शेख,वसंत जाधव,तात्या बंदपट्टे,उमेश भोई,बालाजी भोई,गणेश जाधव,बालाजी यादव,गणेश बाबर,हुसेन फुलारी,तसेच परीसरातील अनेक युवक उपस्थित होते.

       

  या प्रसंगी श्रीकांत देशमुख यांचा भाजप जिल्हाअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीकांत देशमुख यांनी आपण संपुर्ण जिल्हाभरातील सर्व स्तरातील युवकांना पक्षामध्ये विविध पदावर,विविध सेलवर, काम करण्याची संधी देणार आसुन याव्दारे ग्रामीण भागातील आडीआडचणी सोडवण्यावर आपला भर आसुन सर्वसामान्य कुटूंबातील कार्यकर्त्याला पक्षीय बळ देऊन भाजपाचा "सबका साथ सबका विकास" हे ब्रीद वाक्य खरे ठरवणार आहोत.येणा-या काळात जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात पक्षाचे बळ कमी आहे तिथे जास्त जातीने लक्ष देऊन पक्षाची ताकत वाढवणार आसुन             शेतकरी,गोरगरीब उपेक्षित नागरीकांना न्याय देण्याची आपली आग्रही भुमीका आसणार आहे आश्या प्रकारचे मत व्यक्त केले.यावेळी त्यांनी कार्यकर्त्याना निसंकोचपणे आडचणीच्या प्रसंगी आपणास संपर्क साधावा आसा देखील संदेश दिला.


Pages