धक्कादायक :- कोतवालासह अन्य ऐकाने वाळू वसुलीच्या वादातुन कानफटीला लावले पिस्तुल;कोतवाल फरार अन्य दोघे पोलीसांच्या ताब्यात चौकशी सुरु..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, August 11, 2020

धक्कादायक :- कोतवालासह अन्य ऐकाने वाळू वसुलीच्या वादातुन कानफटीला लावले पिस्तुल;कोतवाल फरार अन्य दोघे पोलीसांच्या ताब्यात चौकशी सुरु.....

 


दिव्य न्युज नेटवर्क 

              मंगळवेढा तालुक्यात  वाढणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीने पोलीस व  महसूल प्रशासनाचे बिंग उघड झाले असून वाळू वाहतुकीच्या कारणावरून दोन गटातील वाद उफाळला असुन येथील एका वसुलदार कोतवाल व त्याच्या फंटरने मारापूर येथील युवकाच्या कानपटीला पिस्तुल लावल्याची घटना घडली असून   प्रशासनाच्या बेकायदेशीर वाळू चोरीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे वाळू चोरातील अंतर्गत वादविवाद समोर येत असून याप्रकरणी पोलीस महासनचालक व विभागीय आयुक्त यांनी लक्ष घालून या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी होत आहे.

           

मंगळवेढा तालुक्याला भीमा नदी व माण नदीचा लगत येत असून येथून वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असते सध्या शासकीय वाळू लिलाव बंद असल्याने या नदी पत्रातून बेसुमार अवैध रित्या वाळू उपसा होत असतो याकडे महसूल व पोलीस यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष  होत असून आपले खिसे गरम घेत चलता हैं चलने दो अशी गांधारीची भूमिका घेतली जात आहे पोलीस व म्हसुलखात्याच्या काही वसुलदारामुळे सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीला सोन्याचे दिवस आले आहेत यात अनेक युवकानी व्याजाने  पैसे काढून वाहने घेत हा धंदा अधिकाऱ्यांच्या संमतीने वाळू वाहतुकीचा व्यवसाय करीत आहेत यापूर्वी अनेकजण मंथली देत हा व्यवसाय करीत होते.

           याची महसूल खात्याकडून एका छोट्याशा गावातील कोतवालाकडून वसुली करीत होता तो कोणाची वाहने सुरू ठेवायची कोणाची बंद ठेवायची कोणावर कारवाई करायची हे ठरवीत व वरिष्ठ अधिकारी ही त्याचे ऐकायचे या वसुलीतून त्याने अमाप संपत्ती कमविली असून त्याने मंगळवेढा येथे  तीन बंगले,शेत जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे महिना पाच सात हजार पगार असणाऱ्या कोतवालाने एवढी संपत्ती कोठून गोळा केली हा संशोधनाचा विषय आहे.

          दरम्यान काही दिवसांपूर्वी या वसुलदाराची वसुली करण्याच्या कामावरून हकालपट्टी झाल्याने तो संतप्त झाला व  मारापूर येतील त्या युवकाच्या  तक्राररीवरून व सांगण्यावरून आपल्याला काढल्याचे समजले त्यामुले त्या कोतवालाने  वाळू चोरी करणाऱ्या आपल्या एका फॅन्टरला घेत त्या  युवकाला गाठले व तुझ्यामुळे  मला काढले असून तुझ्या तक्रारींमुळेआम्हाला वाळू वाहतूक करता येईना झाली आमची वाहने पकडून देतो असे म्हणत त्याच्या कान पटीला पिस्तुल लावत बघून घेण्याची भाषा वापरल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे मंगळवेढा येथे वाळू चोरी रोखण्याची ज्यांची जबाबदारी आहे अशा वाळू चोरी करणाराकडून पिस्तुल लावून बघायन घेण्याची भाषा वापरली जात असल्याचे समोर येत असून वाळू धंद्यातील अंतर्गत मतभेद यामुळे समोर आले आहेत यामुळे वाळू चोर करणारे मुजोर झाले.

           असून ते पोलीस व महसुल प्रशासनाला वरचढ ठरत आहेत आपली वाळू चोरी चालू ठेवण्यासाठी पिस्तूलाचा धाक दाखवणे गंबीर असून त्या दोघांनी विनापरवाना पिस्तुल कोठून आणले याची चौकशी होणे आवश्यक आहे वेळीच या घटनांना आवर न घातल्यास मोठ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Add caption


Pages