बेगमपूर परीसरातील समस्त शिवभक्तांच्या वतीने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, August 8, 2020

बेगमपूर परीसरातील समस्त शिवभक्तांच्या वतीने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन....


 बेगमपुर/प्रतिनिधी
               
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामधील मनगुत्ती या गावामधील छञपती शिवरायांचा पुतळा हटवल्याप्रकरणी बेगमपुर येथे परीसरातील सर्व शिवभक्तांनी रोष व्यक्त करत याठीकाणी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करून कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, जि.प सदस्या शैलाताई गोडसे,भिमा काठ बचाव संघर्ष समितीचे बाळासाहेब सरवळे,भारत माने,शिवगडचे रामा सुरवसे,आप्पासाहेब पाटील,वसंत पवार,अरीफ पठाण,डिगंबर कावळे,कुमार माने,महेश जाधव,बाळासाहेब जामदार,पांडुरंग पवार,बाळासाहेब माने,यांच्यासह परीसरातील शिवभक्त उपस्थीत होते,तसेच याठीकाणी राणी वसंत पवार,अर्चना सचिन पवार,ज्योती दशरथ पवार या महीला शिवभक्त ही उपस्थीत होत्या.
           
 यावेळी शिवभक्तांना संबोधित करताना माऊली पवार यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत कर्नाटक सरकारने छञपती शिवरायांचा मनगुत्ती या गावामधील पुतळा काढुन समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखवल्या आहेत.शिवछञपती ही समस्त महाराष्ट्रातील शिवभक्तांची आस्मीता आसुन कर्नाटक सरकारचा हा आपराध अक्षम्य आसुन आज शिवभक्त रस्त्यावर उतरले आहेत पण  येत्या आठ दिवसात छञपती शिवरायांचा पुतळा पुनरस्थापीत नाही केला तर  याची झळ कर्नाटक सरकारला सहन होणार नाही यासाठी राज्य सरकारने कर्नाटक सरकारला याची जाणीव करून द्यावी अन्यथा शिवभक्तच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आसल्याचे सांगीतले. यावेळी कामती पोलिसांना आंदोलनाच्या बाबत निवेदन देण्यात आले..


Pages