धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती...... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, August 15, 2020

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती......

 

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती....


इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली माहिती.


दिव्य न्युज नेटवर्क 

         

धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. २०१८ मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर २०१५ मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला. रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.


Pages