त्या वसुलदार कोतवालावर निलंबनाची टांगती तलवार.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, August 15, 2020

त्या वसुलदार कोतवालावर निलंबनाची टांगती तलवार....


 दिव्य न्युज नेटवर्क            

             मंगळवेढा तालुक्यातील येड्राव येथील कोतवाल सचिन सांगळे यास सातत्याने गैरहजर रहात असल्याचा कारणावरून निलंबनाबाबतची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.

     

 गेल्या चार पाच दिवसापूर्वी एक युवकाला वाळू व्यवसायाच्या कारणावरून तीन सहकारयासह पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकर्णी येड्राव येथील कोतवाल चर्चेत आला होता त्याने वाळू व्यवसायातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना उल्लू बनवत लाखोंची माया गोळा केली होती तो आपली ड्युटी सोडून कामावर न जाता कोतवाल पदाच्या नावावर दुसरेच उद्योग करीत महसूल खात्याचे नाव बदनाम करीत होता.

             याचा उद्योग प्रसार माध्यमातून उघड झाल्यानंतर महसूल खात्याला त्या कोतवालाच्या कृत्याची माहिती झाली तसेच तो गेल्या अनेक दिवसापासून कामावर येत नसल्याचे जाणवले त्यामुळे येथील तहसीलदार रावडे यांनी दि.12 ऑगस्ट रोजी सांगळे यास नोटीस काढत आपण सातत्याने गैरहजर रहात असून कामावर येण्यास सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आपणास का निलंबित करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस पाठवली असून त्यांचा खुलासा अद्यापही न आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे तहसीलदार रावडे यांनी सांगितले


Pages