सहकार क्षेत्रातील नेता काळाच्या पडद्याआड; पंढरपुरचे जेष्ठ माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, August 18, 2020

सहकार क्षेत्रातील नेता काळाच्या पडद्याआड; पंढरपुरचे जेष्ठ माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन.....

 दिव्य न्युज नेटवर्क

       माजी आमदार, ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

           

परिचारक हे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य होते. तर दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले. काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. 2019 सालच्या विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपा कडून लढवली होती.

                5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. यामध्येच त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवार पासून परिचारक अत्यवस्थ होते. अखेर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

           परिचारक यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तरी अशा संकटप्रसंगी त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या एका फेसबुक पोस्ट द्वारे आवाहन केले आहे.

Pages