मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण..... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 2, 2020

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण.....अमित शाह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु....

दिव्य न्युज नेटवर्क
          केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.
   
 अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी”.
        करोनाने देशभरात थैमान घातलेलं असतानाच अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण झाली आहे. काही लोकप्रतिनिधींना करोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरु असून लॉकडाउनही ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Pages