बहिण भावाचे अतुट नाते घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण मोठया उत्साहात साजरा;फुलोंका तारोंका सबका कहना है एक हजारोंमे मेरी बहना है सारी उमर हमे संग रहना है...! - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, August 4, 2020

बहिण भावाचे अतुट नाते घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण मोठया उत्साहात साजरा;फुलोंका तारोंका सबका कहना है एक हजारोंमे मेरी बहना है सारी उमर हमे संग रहना है...!


दिव्य न्युज नेटवर्क
           मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बहिण भावाचे अतुट नाते घट्ट करणारा राखी पौर्णिमा(रक्षाबंधन)चा सण रक्तातील नात्याव्यतिरिक्त मानलेल्या बहिण भावामध्येही मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.दरम्यान,कोरोनामुळे  राखी बांधण्यास भावाला बहिणीकडे जाता न आल्यामुळे व्हॅटसअ‍ॅप व व्हिडिओ कॉलींगच्या माध्यमातून  राखी बांधून घेत फुलोंका तारोंका सबका कहना है एक हजारोंमे मेरी बहना है सारी उमर हमे संग रहना है या गीताच्या ओळी गुणगुणत भावाने बहिणीकडून राखी बांधून घेतली.
             
रक्षाबंधननिमित्त बहिण पौर्णिमा भाऊ पृथ्वीराज याला राखी बांधून औक्षण करताना.
         रक्षा बंधन हा बहिण भाऊ या दोन नात्यामधील धागा घट्ट करणारा सण म्हणून प्राचीन काळापासून ओळख आहे. या दिवशी बहिण भावाला राखी बांधून औक्षण करते.भावासाठी गोडधोड पदार्थ करून जेवू घालते.भावाने बहिणीचे रक्षण करावे असा या राखी बांधण्यापाठीमागे हेतू आहे.सध्या कोरोना संसर्गजन्य साथीमुळे दूरवरचा प्रवास  एस.टी.अभावी बंद असल्यामुळे नांदावयास गेलेल्या बहिणीला भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येता आले नाही.गावे  जवळ असणार्‍या बहिणीने माहेरी येवून भावाला राखी बांधली.दूरवरील बहिणीने व्हॅटसअ‍ॅप व व्हिडिओ कॉलींगच्या माध्यमातून संपर्क करीत रक्षा बंधन सण साजरा केला.कोरोना साथीमुळे प्रतिवर्षाप्रमाणे यंदा रक्षा बंधन सणावर सावट असल्याचे चित्र होते.
         


  •            बाजारात इंडियन मॉडेलच्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यंदा चायना राख्या पुर्णतः हद्दपार झाल्याचे दिसून आले. बहिणीकडून भावाने राखी बांधून घेतल्यानंतर भावाने बहिणीला औक्षण केल्यानंतर भेट वस्तू, साडी,पैसे व दागिन्याच्या स्वरूपात दिल्या.औक्षण केल्यानंतर वस्तू भेट देण्याची परंपरा असून बहिणीला भावाची आठवण रहावी हा उद्देश त्या पाठीमागे आहे. रक्षाबंधनचा सण घरोघरी व्यतिरिक्त अन्य सामाजिक संस्थांमधूनही साजरा करण्यात आला.Pages