मंगळवेढ्यात दूध दरवाढीच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ...... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 2, 2020

मंगळवेढ्यात दूध दरवाढीच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ......
दिव्य न्युज नेटवर्क
            मंगळवेढा येथे दूध दरवाढीसाठी शनिवारी भाजपने पुकारलेल्या रास्ता आंदोलनाकडे  शेतकऱ्यांनानी पाठ फिरवली  मोठा गाजावाजा करून प्रतिष्ठेचे बनलेले हे दूध दरवाढी साठी रास्ता रोको  आंदोलन मंगळवेढा येथे केवळ १० ते १५ भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी  उपस्थितीत फोटो काढून घाईघाईत उरकण्यात आले         
              भाजपच्या मंगळवेढा शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या समनव्याअभावी आक्रमकपणे आंदोलन करण्याच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला आहे या आंदोलनाकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून देशात सत्तेवर असणाऱ्या भाजपाच्या मंगळवेढा शहर व तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे दरम्यान आंदोलन स्थळी दुधाचे कॅन ऐवजी भाजपच्या पदाधिकारी यांना दूध डेअरीतुन १० ते १५ दूध पिशव्या विकत आणून आंदोलन उरकण्याची पाळी आली आहे
              दुधाला प्रतिलिटर दहा रूपये आणि दूध पावडर निर्यातीला किलोला पन्नास रूपये अनुदान मिळावे या मागण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षासह किसान संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी राज्यव्यापी दूध संकलन बंद एल्गार पुकारण्यात आला .मात्र शहरात भाजपच्या १० ते १५ पदाधिकारीच्या  उपस्थित घेण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलना व्यतिरिक्त अपवाद वगळता तालुक्यात एकाही भाजपच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी यांनी दूध दरवाढीचे आंदोलन न  केल्याचे शनिवारी दुपारपर्यंत दिसून आले
         
 दूध उत्पादकांना सध्या लिटरला केवळ १८ ते २० रूपये दर मिळत आहे. हा दर न परवडणारा आहे. यातून उत्पादन खर्च देखील भागत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठ दिवसापूर्वी दूध संकलन बंद आंदोलन केले. त्याच वेळी भाजप व मित्रपक्षानी देखील आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी  राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना असे मिळून असलेल्या सरकारवर मोठी कडाडून टीका केली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुका अध्यक्ष संतोष मोगले ,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश डोंगरे ,युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे ,माजी तालुकाध्यक्ष सुधीर करंदीकर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव ,सुनील रत्नपारखी , सत्यजित सुरवसे, तालुका सरचिटणीस विश्वास चव्हाण ,माजी नगराध्यक्ष अशोक माळी, विजय बुरकुल, विस्तारक अशोक इंगळे ,विकास काळे ,आप्पु स्वामी , उमेश विभूते, आदी उपस्थित होते

Pages