पिस्तुल लावल्याप्रकरनी त्या दोन वाळूमाफियाना पोलिसांनी दिला चोप;वसुलदार कोतवाल मात्र गायब.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, August 12, 2020

पिस्तुल लावल्याप्रकरनी त्या दोन वाळूमाफियाना पोलिसांनी दिला चोप;वसुलदार कोतवाल मात्र गायब....


मंगळवेढा/प्रतिनिधी

               मंगळवेढा येथिल त्या युवकाच्या कान पट्टीला पिस्तुल लावून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या दोन वाळू माफियांना मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेत चांगलाच चोप देत त्यांची मस्ती उतरवली परंतु तो वसुलदार कोतवाल मात्र पोलीसांच्या हाती लागला नाही.

           

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात वाळूचे लिलाव बंद असताना एक ग्रामीण भागातील कोतवाल मात्र स्वताला मिनी तहसीलदार समजून काही वाळू माफियांना हाताशी धरत चोरटी वाळू वाहतूक सुरू ठेवुन आपले उखळ पांढरे करीत होता  त्याने आतापर्यंत भरपूर माया जमविल्याने आपले कोणी काही करू शकत नाही या हेतूने तो वागत होता परंतु त्याचा  तहसीलदारांच्या अपरोक्ष चालेला हा उद्योग येथील  महसुलाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्याची त्यांनी खरडपट्टी केली त्यामुळे त्याच्या वसुलीच्या उद्योगावर गंडांतर आल्याने तो चिडला  त्याला येथील एका युवकाचा संशय आल्याने आपल्या दोन वाळूमाफिया साथीदारांसह त्याला गाठीत माझ्या व्यवसायास तू आडकाठी आणत असून तुला मस्ती आली आहे तुला बघून घेतो अशी भाषा वापरत त्यांनी त्या युवकाच्या कान पटीला पिस्तुल लावली परंतु त्या युवकाचा त्या कोतवालाच्या  उद्योगाशी काही संबंध नसताना त्याला कोटवालने पिस्तूलाचा धाक दाखवून दमबाजी केल्याने त्या युवकाने पोलीस महानिरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे  या प्रकाराबाबत तक्रार केली त्यामुळे या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी त्या दोन वाळूमाफियाना ताब्यात घेत चौकशी करून पोलीस ठाण्यात चांगला चोप देत चांगलीच अद्दल घडवली परंतु या प्रकरातील महत्वाचा असणारा सरकारी पगार घेऊन शासनालाच वाळू चोरीच्या माध्यमातून चुना लावणारा कोतवाल मात्र पोलीसाना सापडला नाही मंगळवेढा तालुक्यात वाळू माफियाकडून एखाड्या व्यक्तीला धमकावन्याची पहिली वेळ असून हा गंभीर प्रकार मंगळवेढा परिसरात घडल्याने  नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे  या घटनेनंतर अनेक समाजसेवकांनी या प्रकरनात सहभाग घेत प्रकरण आपसात मिटवून घेतल्याचे समजते

Pages